या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२८२] युरोपामध्यें १८ व्या शतकांत व्यत्किक तत्वाचा फार फैलाव झालेला होता. म्हणून राष्ट्रीय सामाजिक पंथाला आपल्या योजना अमलात आणण्यास फारच त्रास व अडचण पडली. परंतु हिंदुस्थानांत अनियंत्रित राज्यसत्ता असल्यामुळे व मूळचें सरकार मायबापवजा लोकांना वाटत असल्यामुळे सरकारनें लोकांच्या कल्याणाची गोष्ट हातीं घ्यावी किवा नाहीं हा प्रश्नच उद्भवला नाहीं. शिवाय येथें सरकार सुधारलेलें व लोक मागसलेले असा प्रकार असल्यामुळे महत्वाची औघोगिक कामें सरकारनें सुरू कैली व तीं सरकारच्या मालकीचिंच आहेत. येथे बहुतेक सर्व जमीन सरकारच्याच मालकीची आहे असें सरकार समजतें. सर्व दळणवळणाचीं साधनें, पोस्ट, टेलिग्राफ, रेल्वे, रस्ते वगैरे सर्व सरकारच्या मालकीचींच आहेत. शिवाय कालवे व पाटबंधारे हेही सरकारच्याच मालकीचे अहेत, जंगलें, खाणी व मिठाचे कारखाने हे सर्व सरकारच्याच मालकीचे आहेत. तेव्हां येथें बहुतेक सामाजिकपंथी योजनांचा प्रत्यक्ष अंमल चालू आहे असें ह्राणण्यास हरकत नाहीं. परंतु हिंदुस्थानच्या विशेष परिस्थितीमुळें या योजनांचा बहुजनसमाज व्हावा तितका फायदा झाला आहे याबदल शंका आहे. या सर्व बिकट प्रश्राचा आपल्याला सहाव्या पुस्तकांत विचार करावयाचा आहे. तेव्हां हा लांबलेला भाग आतां येथेंच थांबविणें बरें.