या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थशास्त्राचीं मूलतत्वें. पुस्तक चवथें. विनिमय, भाग पहिला. सामान्य विचार.

प्रास्ताविक पुस्तकांत निर्दिष्ट केलेल्या विषयक्रमानुरूप आतां विनिमय अगर अदलाबदल व तत्संबंधीं सर्व प्रश्र यांचा या पुस्तकांत सविस्तर विचार करावयाचा आहे. आतांपर्यंत विवेचन केलेल्या अर्थशास्त्राच्या अंगांपेक्षां या अंगाचें महत्व फार आहे. कारण सामान्य मनुष्यास व मेंकलाऊड या अर्थशास्त्रज्ञास या विषयाचें इतकें महत्व वाटतें कीं, त्यांनीं अर्थशास्त्र ह्राणजेच ' विनिमय मीमांसाशास्त्र ' असें अर्थशास्त्राचें लक्षण केलें आहे. हें लक्षण एककल्ली व एकतफीं आहे हें मागें दाखविलेंच आहे. परंतु या गोष्टीवरून विनिमय हा विषय इतर विषयांपेक्षां जास्त महत्वाचा आहे एवढें तरी सिद्ध होतें हें निर्विवाद आहे. हा विषय महत्वाचा वाटण्याचें दुसरेंही एक कारण आहे. तें हें कीं, पुष्कळ अर्थशास्त्रकारांनीं विनिमयक्षमता अथवा खरेदीविक्री होण्याची पात्रता हा संपत्तीचा मुळीं लक्षणीभूत गुण मानला आहे. परंतु संपत्तीचा हा गुण प्राथमिक नसल्यामुळें तो मागील विवेचनांत लक्षणामध्यें घेतला नाही. तरी सामान्य