या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२८४] व्यवहारांत या गुणाचें फार महत्व आहे हें खरें आहे. शिवाय समाजाच्या बाल्यावस्थेंत विनिमयाला फारसें महत्व नसतें खरें; कारण त्या काळीं प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा आपल्याच श्रमानें भागवीत असतो; यामुळें त्याला संपत्तीची अदलाबदल करण्याचा प्रसंग फारच थोडया वेळां येतो. परंतु अर्वाचीन काळीं प्रचंड कारखान्यांच्या सार्वत्रिक पद्धतीमुळे स्वतःच्या गरज़ा भागविण्याकरितां धंदा करणारा माणूस विरळा. सुधारलेल्या देशांत सर्व लोक आपल्या श्रमाचीं फळें दुसऱ्यास मोबदल्यानें देण्याच्या अगर विनिमयाच्या उद्देशानें तयार करतात ह्राणून औद्योगिक प्रगतीबरोबर विनिमयाचें महत्व वाढतच जातें. तसेंच अर्वाचीनकाळीं संपत्ताची वांटणीही बहुतेक अंशीं विनिमयानेंच होते. कारण मजूर आपल्या श्रमाची मजुरी घेऊन विनिमय करतो. जमिनीचा मालक आपल्या जमिर्नीचा उपयोग विनिमयानेंच दुसऱ्यास देतो. सारांश, भाडें, मजुरी, व्याज व नफा हे संपत्तीच्या वांटणीचे मुख्य चार भाग हल्लींच्या काळीं रुढान किंवा कायघानें न ठरतां करारानें ठरले जातात व ते त्या त्या वर्गाला विनिमयानें मिळतात. यामुळच कित्येक अर्थशास्रकार वांटणीचा अन्तर्भाव ' विनिमय ' या विषयांत करतात. यावरुनही विनिमयाचें महत्व दिसून येतें. शेवटीं ' विनिमय ' या विपयाचें इतकें महत्व असयाचें कारण असें आहे कीं, ‘ विनिमय ' हा अर्वीचीनकाळीं संपत्तीच्या उत्पत्तीचाच एक घटकावयव बनला अहे. कारण संपत्तीच्या उत्पत्तीची परिपूर्णता माल गि-हाइकच्या हातीं पडल्याखेरीज होत नाही. अर्वाचीनकाळीं कारखानदार प्रचंड प्रमाणावर माल उत्पन्न करतातः मग तो माल घाऊक व्यापारी त्यांचेपासून विकत घेतात; घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात व शेवटी किंरकोळ व्यापारी प्रत्यक्ष उपभोग घेणा-या गि-हाईकांना विकतात. तेव्हां माल गि-हाईकाच्या हाती येण्यापूर्वी त्याची तीनदां अदलाबद्द्द्ल अगर विनिमय व्हावा लागतो. वरील विवेचनावरून ' विनिमयाचें ' महत्व सहज ध्यानांत येईल व शिवाय त्यावरूनच अर्थशास्त्राची उत्पत्ति, वांटणी व विनिमय, हीं अंगें कशी परस्पवलंबी आहेत हेंही दिसून येईल. जरी विवेचनाच्या सीईकरितां अर्थशास्त्राचे असे तीन भाग पाडले तरी प्रत्यक्ष व्यवहारांत हे तिन्ही भाग