या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[R<<] सारांश, सामान्य व्यवहारांत मोल व किंमत या शब्दामध्यें फरक धरला जात नाहीं. परंतु कोणत्याही शास्त्रविषयाचें हें पहिलें काम आहे कीं, सामान्य व्यवहारांतील शब्दाच्या व्याख्या व त्यांमधील स्रुक्ष्म फरक हें निश्रित करावयाचें. तद्नुरूप या भागांत मोल व किंमत या शब्दांमधील सूक्ष्म भेद प्रथमतः ठरविला पाहिजे व मग या कल्पनांच्या कारनांकडे वळलें पाहिजे. अर्थशास्त्राच्या परिभाषेप्रमाणें मोल व किंमत यांमध्यें सामान्यविशेषत्वाचा भाव आहे व या दोन्ही कल्पनांच्या व्याख्या ठरवितांना विशेषांकडून सामान्याकडे जाणें सोईस्कर आहे. कारण मोल व किंमत या दोन शब्दार्थांमधील दुसरा अर्थ जास्त सुलभ व स्पष्ट आहे. कोणत्याही वस्तूची किंमत म्हणजे या वस्तूबदल घावे लागणारे पैसे असें आपण समजतों. घडयाळाची किंमत १५ पासून ७५ रुपयांपर्यंत आहे. ह्राणजे एका मनुष्यास जर बाजारांत साधारण ब-यापैकीं घडयाळ विकत घ्यावयाचें असेल तर त्याला देशांमध्यें सर्व संमत असलेला जो पेसाहिंदुस्थानांत रुपये अगर पौंड-या रूपानें १५ पासून ७५ रुपयांपर्यंत घडयाळाच्या गुणातप्रमाणें किंमत घ्यावी लागेल. अर्थात किंमत म्हणजे कोणतीही विक्रीची वस्तु व देशांतील नाणें यांच्या अदलाबदलीचा संबंध होय. ह्राणजे वस्तु विंकत घेण्याकरितां देशांतील पेशाचें घ्यावें लागणारें प्रमाण ती त्या वस्तूची किंमत होय. आतां मोलाची कल्पना ही यांपेक्षां व्यापक आहे. कोणत्याही वस्तूचें मोल ह्राणजे एका वस्तूचें दुसऱ्या वस्तूशीं अदलाबदलीचें प्रमाण होय. देशामध्यें पैसा किंवा नाणें याचा प्रदुभवि होण्यापूवीं वस्तूची अदलाबदल ऐनजिनशीच आहे असें इतिहासावरून दिसतें. हिंदुस्थानांतही अझून सुद्धां अगदीं खेडेगांवांत ऐनजिनसी अदलाबदल चालते. शेतकरी आपल्याजवळ असललें धान्य वाण्याच्या दुकानीं आणतो व तो तें धान्य वाण्यास देऊन आपल्याला लागणाऱ्या इतर वस्तू विकत घेतो. येथें निरनिराळ्या वस्तूंचें मोल धान्यांत मोजळे जातें. तसेंच रानांतील कांतवाडी वगैरे अगदीं रानटी जाती रानांतील फळमुळादि खाघ पदार्थ गोळा करून शहरांत आणतात व त्याच्या बदला धान्य, मीठ, मिरची, कापड वगैरे लागणारे पदार्थ घेऊन जातात. येथेंही अदलाबदल ऐनजिनसीच होते. तेव्हां मोल या शब्दाचा सापेक्ष अर्थ आहे असें होतें. वस्तूचें मोल म्हणजें अदलाबदलीमध्यें किंवा विनिमयामध्यें एका वस्तूकरितां घावी लागणारी