या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९० ] चालतों व त्याच्या मानानें सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या अगर सररहा सर्व वस्तू महाग झाल्या असें आपण म्हणतों. परंतु सर्व वस्तूंचें सररहा मोल मात्र वाढणें . शक्य नाहीं. कारण मोल ही संज्ञाच जर सापेक्ष आहे तर सर्व वस्तूंचें मोल एकदम सररहा वाढणें हें अशक्य आहे. कारण एका वस्तूचें मोल वाढलें तर तिच्याशीं तुलना केलेल्या दुस-या वस्तूचें मोल कमी झालेंच पाहिजे. उदाहरणार्थ दहा शेर गव्हाला पूर्वी दोन मण लांकडें मिळत असत तीं आतां एक मणच मिळू लागलीं असें समजा. म्हणजे लांकडांचें मोल वाढलें असें होईल. कारण पूर्वी एका मणाला पांच शेर गहूं पडत तेच आतां एका मणाला दहा शेर गहूं पडू लागले. अर्थात् लांकडाच्या दृष्टीनें मोल वाढलें. परंतु तेंच गव्हाच्या दृष्टीनें पाहिलें असता गव्हाचे मोल कमी झाले आहे. असे म्हटले पाहिजे. कारण पूर्वी दहा शेर गव्हांला दोन मण लांकडें मिळत. तीच आतां तेवढ्याच गव्हाला एक मणच मिळतात म्हणजे गव्हाचें मोल निमे कमी झालें असें होतें. यावरून सर्व पदार्थाचें मोल सररहा वाढणें हें अगदीं अशक्य आहे हे सहज ध्यानात येईल. कांहीं वस्तूंचें मोल वाढलें याचाच अर्थ कांहीं वस्तूंचें मोल कमी झालें असा आहे. कारण मोलाची कल्पना सापेक्ष आहे व ती निरनिराळ्या वस्तूंच्या संबंधावर अगर तुलनेवर अवलंबून आहे. येथपर्यंत मोल व किंमत या कल्पनांमधील फरक व त्यावरुन निघणारा एक सिद्धांत याचें विवेचन केलें. आतां मोलासंबंधींच्या एका वादग्रस्त प्रश्नाकडे वळलें पाहिजे व या वादाचें विवेचन करतांनाच अर्वाचीन अर्थशास्त्रकारांनीं काढलेली आवशेषिक मोलाची कल्पना व धारेवरील मोलाची कल्पना यांचें स्पष्टीकरण केलें जाईल. मोल या शब्दाची व्याख्या करतांना अॅडाम स्मिथनें या शब्दामध्यें एक संदिग्धता आहे तिचा उल्लेख केला आहे. त्याचे मतें मोल दोन प्रकारचें आहे. एकवस्तूचें उपयुक्तता-मोल व दुसरें विनिमय-मोल;किंवा केवल मोल व साक्षेप मोल. अमकी वस्तु मोलवान् आहे असें म्हटले म्हणजे ती वस्तु उपयोगी आहे इतकाच त्याचा अर्थ केव्हा केव्हां कला जातो. हे वस्तूचें केवळ मोल अगर उपयुक्तता-मोल होय. अर्थशास्त्रात उपयुक्ता-मोलाचा विचार कुला जात नाही अर्थशास्त्रात विनिमय-मोलाचाच फक्त विचार केला जातो. म्हणजे