या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९३] हे अगदी खोटें आहे, ती काळी आहे. वास्तविकपणे ती ढाल एका बाजूला पांढरीही होती व दुसऱ्या बाजूला काळीही होती. तोच प्रकार मोलाच्या मीमांसेचा आहे.वस्तूचे मोल कशानें उत्पन्न होतें ? एक पक्ष म्हणते, उपयुक्तता हेंच मोलाचे कारण अगर बीज आहे.तर दुसरा पक्ष म्हणतो, वस्तु तयार करण्यास लागणारा खर्च अगर व्यय हेंच मोलाचें कारण अगर बीज अहे. वास्तविक प्रकार असा आहे कीं, निव्वळ उपयुक्ततेनें मोल ठरत नाही किंवा निव्वळ उत्पादनव्ययानेही मोल ठरत नाही. तर मोल हे उपयुक्तता व उत्पादनव्यय या दोहोंच्या संमेलनाने उत्पन्न होते.म्हणजे मोलवान् वस्तूमध्ये उपयुक्तता व उत्पादनव्यय असे दोन्हीही गुण असावे लागतात. हे दोन गुण संपत्तीच्या व्याख्येत मानवी वासना तृप्त करण्याची शक्ति व श्रमसाध्यता या नांवानें निर्दिष्ट केले होते. शिवाय पृथक्पणा व अधीनता हे दोन्ही गुणही संपत्तीत पाहिजेत असे मागे दाखविले आहे. व या गुणचतुष्टयाचा संकलित परिणाम म्हणजे वस्तूचें मोल होय. हे चारी गुण थोड्याफार अंशाने प्रत्येक वस्तूमध्ये पाहिजेत. एखाया मोलवान् वस्तूमध्ये उपयुक्ततेचे प्रमाण बाकीच्या गुणांपेक्षां जास्त असेल तर दुसऱ्या मोलवान् वस्तूमध्ये उत्पादनव्ययाचे प्रमाण बाकीच्या गुणांपेक्षा जास्त असेल. परंतु प्रत्येक मोलवान वस्तूमध्यें थोड्याफार अंशानें चारही गुण असले पाहिजेत तर त्या वस्तूमध्यें मौल्यवत्ता हा गुण उद्भूत होईल. आतां जेव्हन्स याने व दुसऱ्या अर्थशास्त्रकारांनी काढलेल्या एक दोन नवीन कल्पनांचा विचार केला पाहिजे. वर सांगितलेंच आहे कीं, मोल या शब्दाची व्याख्या ठरवितांना अॅडम स्मिथने मोल यामध्ये केवळ मोल व विनिमयमोल असा अर्थभेद दाखविला आहे. व केवळ मोल म्हणजे उपयुक्तता होय. व वस्तूची उपयुक्तता ही मनुष्याच्या गरजा व वासना यांवर अवलंबून आहे. एकाला जी वस्तु अत्यंत उपयोगी असेल ती दुसऱ्याला अगदीं निरुपयोगी असेल. याचे एक उदाहरण म्हणजे अंधळ्या मनुष्याला चष्मा अगदीं निरुपयोगी असेल तर तो अधु- डोळ्याच्या माणसाला अत्यंत उपयोगी असेल. परंतु बाजारांत येणारें वस्तूचे विनिमयमोल किंवा किंमत व ही उपयुक्तता यांमध्ये फारसा संबंध नाहीं व अर्थशास्त्रात या दुसया अर्थाशी आपल्याला कांहीं एक कर्तव्य