या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कांहीं मर्यादेपर्यंतच चालतात. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्यें शिलिंग हें रुप्याचें नाणें आहे. परंतु तें उपपैशाच्या जातीचें आहे. तें फक्त ४० शिलिंग किंवा दोन पौंडांपर्यंतच कायदेशीर चलन आहे. म्हणजे ४० शिलिंगांपेक्षां देवघेवींत कोणी जास्त शिलिंग देऊं लगला तर कायदेशीर रीतानें ते नाकारतां यंतील. परंतु देशांतील मुख्य पैश्यासंबंधीं चालावयाचें नाहीं. या पैशालाच कायदेशीर फेडीचें चलन म्हणतात. हीं नाणीं हव्या तितक्या मर्यादेपर्यंत देवघेवींत घेतलींच पाहिजेत असा निर्बंध असतो.

       आतां आजपर्यंत झालेल्या व सध्यां प्रचलित असलेल्या चलनपद्धतींचा विचार केला पाहिजे. याचे स्वाभाविक पांच प्रकार होतात ते असे:- १ तुलनात्मक चलन पद्धति-सर्वात जुनी व सर्वांत सोपी अशी ही पद्धति आहे यांत शंका नाहीं. सोन्यारुप्याचा पैशाकडे उपयोग होऊं लागला म्हणजे प्रथमतः लोक याचा इतर जिनसांप्रमाणेच व्यवहार करतात. म्हणजे ऐनजिनसी व्यवहारामध्यें ज्याप्रमाणें दोन्ही वस्तूंची अदलाबदल तोलून किंवा मापानें होते, त्याप्रमाणें विकत घ्यावयाच्या पदार्थाची किंमत एक सोन्याचा तुकडा वजन करून दिली जाते. सर्व दशांत अशीच पूर्वी पद्धति होती असें इतिहासावरून दिसतें. ज्याप्रमाणें तुलनात्मक चलन-पद्धति ही धातूचा उपयोग होऊं लागल्याबरोबरची स्वाभाविक पद्धति आहे त्याप्रमाणेंच कांहीं विशिष्ट परिस्थितींत तिचें पुनरुज्जीवन होतें. उदाहरणार्थ, जेव्हां एखाद्या देशांतील प्रचलित नाणीं हीं मुद्दाम हीणकस केलीं जातात किंवा लोकांचा त्यावरील विश्वास उडून जातो त्या वेळीं लोक नाणीं मोजून न घेतां कस पाहून तोलून घेऊं लागतात. तसेंच राष्ट्रराष्ट्रामध्यें सांकेतिक असा पैसा किंवा विनिमयसामान्य नसल्यामुळे या राष्ट्रराष्ट्रामधील व्यापारांतही तुलनात्मक चलन-पद्धतीच प्रचलित असते. हिंदुस्थानांतील रुपये हे चीनमध्यें चालत नाहीत तर तेथें ते तोलून त्यांतील चांदीच्या वजनाच्या भावानें स्वीकारले जातात. अर्थात् अशा ठिकाणीं नाणें व निवळ रुपें यामध्यें खरोखरी फरक नसतो.

२ एकात्मक चलन पद्धत-या पद्धतीमध्यें एकच धातु कायदेशीर फेडीचें चलन असतें. व यामध्यें त्या धातूचें एकच नाणें पाडलें जातें. इंग्लंडमध्यें पूर्वी अशी पद्धति होती. तिस-या एडवडे राजाच्या कारकीर्द पर्यंत इंग्लंडमध्यें एकच धातूचीं नाणीं पाडीत असत व नाणेंही एकच