या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घेवींत अमर्याद चालतात. परंतु रुप्याची व् ब्रांझ धातूचीही नाणीं तेथें पाडतात. पण त्यांची चलनमर्यादा ठरलेली असते. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्यें रुप्याचे शिलिंग दोन पेोंडांपर्यंत चालतात व ब्रांझचे पेन्स, हाफूपेन्स व फार्दिग्ज हे १ शिलिंगापर्यंतच चालतात. म्हणजे फेडींत मनुष्याला ४० शिलिंगांपेक्षा जास्तू शिलिंगू व बारा पेन्सा पेक्षां जास्त पेन्स देतां येणार नाहीत. बहुतेक सर्व देशांत हीच पद्धति प्रचलित आहे. शुद्ध एक चलनपद्धति किंवा शुद्ध द्विचलनपद्धति हल्ली फारच थोड्या ठिकाणीं चालू आहे.

   ५ लंगडी द्विचलन पद्धति- ही पद्धति शुद्ध द्विचलनपद्धतींतून किंवा एक चलनपद्धतींतून अलीकडे अस्तित्वांत आली आहे. या पद्धतीमध्यें प्रत्यक्ष व्यवहारांत दोन धातूंचीं नाणीं अमयांद प्रमाणांत चालतात तेव्हां द्विचलन पद्धतीचा एक गुण यांमध्यें असतो खरा, तरी पण या  पद्धतीत द्विचलन पद्धतीचा दुसरा गुण नसतो. म्हणजे यामध्यें दोन्ही धातूंची नाणीं टांकसाळीत पाडून मिळत नाहींत; तर फक्त एकाच धातूचीं नाणी लोकांना पाडून मिळतात. परंतु दोन्ही धातूंचीं नाणीं सरकारला पाडतां येतात. ही पद्धत १८७१ नंतर अस्तित्वांत आलेली आहे. व १८९३ ते १८९८ पासून हिंदुस्थानांतील पद्धतिही याच प्रकारची झाली आहे. तिचा पुढील एका भागांत सविस्तर विचार करावयाचा आहे.
  आतां या पद्धतींपैकी सर्वात चांगली पद्धति कोणती हे  ठरवावयाचें आहे, या पांचापैकीं पहिल्या दोन या सदोष आहेत व सुधारलेल्या देशांतून त्या आतां नाहीशा झाल्या आहेत. शेवटची पद्धति ही काहीं विशेष परिस्थितींत उत्पन्न झालेली आहे. हलींच्या काळीं उपपैशाची पद्धति सर्वत्र सुरू असते. तेव्हा  वादग्रस्त प्रश्न मुख्य पैशासंबंधीं राहिला. तेव्हां एक चलनपद्धति चांगली कीं, द्विचलनपद्धति चांगली याचा निर्णय पुढील एका स्वतंत्र भागांत करणें इष्ट आहे.
  या पांच चलनपद्धतींपैकी सध्यां बहुतेक सुधारलेल्या देशांमध्यें चवथी किंवा पांचवी यांपैकी कोणती तरी पद्धति चालू आहे. चवथ्या पद्धतीचें उत्तम उदाहरण इंग्लंडच्या चलनपद्धतीचें आहे. व ज्या अर्थी इंग्लंडची चलनपद्धति हीच तात्विकदृष्ट्या हिंदुस्थानची चलन-पद्धति