या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३३४] सोळा आणे कसाचें अमुक वजनाचें सोनें अथवा सोळा आणे कसाच अमुक वजनाचें रुपें असा होईल.

   एका देशांतील व्दिचलन पद्धति-आतां असें समजा कीं, अघोगिक जगावर अवलंबून न राहतां स्वतंत्रपणें मागील पॅरिग्राफांत सांगितलेली द्विचलनपद्धति एखाघा  देशानें स्वीकारली. तर आतां प्रक्ष असा आहे कीं, ही पद्धति कोणत्या अटीवर चालू शकेल व अंमलांत राहील. ही पद्धति पूर्णपणें अंमलांत राहणें यामध्यें दोन्ही धातूंना खुल्या टांकसाळी असणँ कर्जदारांच्या खुषीप्रमाणें वाटेल तितक्या रकमेपर्यंत दोन्ही धातू कायदेशीर फेडीचें चलन असणें; व कायघानें ठरविलेल्या प्रमाणाची स्थिरता असणें इतक्या गोष्टींंचा समावेश होतो हें उघड आहे. आतां ही स्थिति राहण्यास एक अवश्यक व पुरेशी अट म्हणजे कायघानें ठरविलेलें दोन्ही  धातूंमधील विनिमयप्रमाण व बाजारांतील प्रमाण हीं एकच असणें ही होय. (हलींच्या इंग्रजी चलन पद्धतीमध्यें ज्याप्रमाणें पौंड  किंवा तितक्या पौंडांच्या चलनी नेोटा पैशाचे करार पुरे करण्यास उपयोजितां येतात त्याप्रमाणेंच) जोंपर्यंत हें प्रमाणैक्य कायम  आहे तोंपर्यंत कर्जदाराला किंवा सावकाराला कोणत्याही धातूच्या नाण्यामध्यें फेड करण्यास किंवा फेड घेण्यास हरकत नाही.परंतु कायदेशीर विनिमयप्रमाणांत व बाजाराच्या विनिमयप्रमाणांत अंतर पडल्याबरोबर ग्रेशॅमच्या सिद्धांताची अंमलबजावणी होऊं लागेल. समजा कीं, कांहीं वजनाच्या सोन्याच्या धातूच्या बदली कायदेशीर प्रमाणापेक्षां जास्त रुप्याचीं नाणीं बाजारांत मिळू लागलीं. आतां हें उघड आहे कीं, अशा स्थितींत सोन्याच्या नाण्याचा मालक तीं सोनें ह्राणून बाजारात विकील नाण्यांनीं आपल्या कर्जाची फेड करील. अशा व्यवहारांत त्याला कांही तरी फायदा राहील. तसेंच या स्थितींत कोणीही मनुष्य सोनें टांकसाळींत नेणार नाहीं. कारण  त्या सोन्याबद्दल बाजारांत टांकसाळीपेक्षां जास्त रुप्याचीं नाणीं मिळतात. काेणी असें म्हणतील कीं, एकदां दोन्ही  धातूंचीं नाणीं प्रचलित झालीं म्हणजे संवयीच्या प्रभावानें तीं कायदेशी भावानें प्रचारांत राहतील.परंतु मागें सांगितलेंच आहे कीं,  हिणकस नाण्याची संख्या मर्यादित असेल तर तीं प्रचारांत  राहतांल. हें खरें आहे कीं, प्रथमत: सामान्य लोकांना एका धातूचा झालेला अपकर्ष घ्यानांत येणार नाही. परंतु सराफ व पेढीवाले