या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३३८]

चांदीची पैदास फक्त ४ कोटी पौंडांची आहे. यापैकीं ५० लक्षांची चांदी नव्या सोन्याच्या ऐवजी खपेल व म्हणून ३ कोटी ५० लक्ष चांदी शिल्लक राहील. आतां एवढ्या चांदीनें ५० कोटी प्रचारांत असलेलें सोनें नाहींसें व्हावयाचें आहे व वरच्या आंकड्यांप्रमाणें असें होण्यास पंधरा वर्षे तरी लागतील व प्रतिरोधक कारणें अस्तित्वांत नसलीं तर या काळापूर्वी व्दि-चलन पद्धति ढांसळून जाईल. पण येथपर्यंत एका बाजूनेंच विचार झाला आहे. परंतु प्रचारांतून नाहींसें झाल्यानंतर एवढें सोनें जाणार कोठे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हें उघडच आहे कीं, हे सर्व सोनें बाजारांत विकावयास आले पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या १ कोटी ५० लक्षांच्या पुरवठ्यांत चांदीनें मोकळू केलेल्या ४ कोटी पैौंड सोन्याची भर पडली; त्यांतच पूर्वी नाण्यांत खर्च होत असलेलें सोनेही मोकळे झालें. अर्थात पूर्वीच्या वार्षिक पैैदाशाच्या तिप्पट सोनें एकदम बाजारांत आलें. इतक्या मोठ्या वाढीचा परिणाम सोन्याच्या मोलावर झाला पाहिजे, हें उघड आहे. तेव्हां एका वर्षांचा फाजील पुरवठा डागडागिन्यांत खपून जाण्यापूर्वीच सोन्या-रुप्याचा भाव जुन्या कायदेशीर पदांवर येईल यांत शंका नाहीं; व आतां चांदीकडे पाहिलें तर हे विवेचन दृढ़तर होतें. कारण अशा स्थितींत चांदीला मागणी फार होऊन तिची किंमत वाढेल. तसेंच प्रथमारंभ जोपर्यंत चांदी ही अवकृष्ठ धातु आहे तोपर्यंत चांदीच्या उत्पत्तीपेक्षां सोन्याच्या उत्पत्तीला उत्तेजन मिळेल. वरील गृहीत दाखल्यावरून असें दिसून येईल की, समतावह क्रियेनें व्दिचलन पद्धति-अआंतरराष्ट्रीय-असल्यास मुळीच ढासळणार नाही, परंतु याला इतिहासाचे प्रमाणही दाखवता येते.सन १५०० पासून सन १५०० पासून सन १८७३ पर्यंत सुमारें चार शतकांच्या यूरोपच्या इतिहासाकडे पाहिलें असतां सोन्यारूपाच्या भावामध्ये फारशी झाली नाही, असे पुढें पानांत, [३५९] दिलेल्या कोष्टकावरून दिसून येईल याचें कारण यामुळे थोड्याशा बहुतेक सर्व देशांत व्दिचलनपद्धती सुरू होती व यामुळे थोड्याशा तरी ती हळूहळू झाला व त्याने व्यापाराला एकदम धक्का बसला नाहीं. १८७३ च्या पूर्वीच्या सत्तर वर्षांतली भावाची स्थिरता