या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. परंतु आकस्मिक कारणांनीं युरोपांतील इतर देशांतील कायद्यानें ठरलेला भाव हा चांदीला अनुकूळ होता. तर तो इग्लंडमध्यें सोन्याला अनुकूळ होता. यामुळे इंग्लंडमध्यें सोन्याचें नाणें विशेष प्रचारांत आलें तर फ्रान्समध्यें चांदीचीं नाणीं विशेष प्रचारांत आलीं. सर्व युरोपमध्यें इंग्लंडची औद्योगिक व व्यापारी बाबतींत सर्वांत जास्त भरभराट होती व नेपोलियनच्या काळामध्यें सर्व युरोपांत लढाया चालू होत्या, यामुळें युरोपांतील उद्योगधंदे मागें पडल्यासारखे झाले; परंतु इंग्लंडमध्यें पूर्ण शांतता होती व जरी इंग्लंडनें नेपोलियनविरुद्ध पुढाकार घेतला व जरी इंग्लंडानेंच युरोपांतल्या सर्व देशांना नेपालियनविरुद्ध लढण्यास पैसा पुरविला तरी या घडामोडींनीं इंग्लंडच्या व्यापारावर अनिष्ट परिणाम न होतां उलट इंग्लंडचें व्यापारी वर्चस्व जास्तच दृढतर झालें. १८१५- मध्यें नेपोलियनचा पराजय होऊन इंग्लंड या भयंकर युद्धामधून विजयश्रीनें मंडित असें बाहेर पडलें व या युद्धाच्या समाप्तीनंतर तर इंग्लंडमध्यें व्यापारास जास्तच जोर आला. या वेळीं चांदीचा भाव उतरत जाणार अशी धास्ती इंग्लंडांतील मुत्सद्यांना पडली होती व यामुळे सोनें ही धातु पैशाच्या द्रव्याला जास्त स्थिर व सोईची असा समज झाला होता. शिवाय इंग्लंडाला उद्योगधंद्याच्या व व्यापाराच्या भरभराटीनें संपन्नता आली होती. यामुळें जास्त किंमतीचीं सोन्याचीं नाणींच एकंदरींत चांगलीं असा समज होऊन १८१६ मध्यें इंग्लंडनें सोन्याची एकचलनपद्धति स्वीकारली व या काळीं इंग्लंडच संपन्नतेंत, व्यापारांत व एकंदर राज्यविस्तारांत प्रमुख पदाप्रत पावलेलें असल्यामुळें इंग्लंडच्या संमतीखेरीज कोणतीच गोष्ट होणें अशक्य झालें; व इंग्लंडानें आपली चलनपद्धति न बदलण्याचा निश्चय चालविल्यामुळें इतर सर्व राष्ट्रांना-इंग्लंडचें अनुकरण करण्याच्या बुद्धीनेंह्मणा किंवा नाइलाज ह्मणून ह्मणा-एकामागून एक एकचलनपद्धतीचा स्वीकार करावा लागला. याप्रमाणें येथें गुरुत्वाकर्षणाचें तत्व लागू झालें. नेपोलियनच्या लढाईंत पोर्तुगालला ईंग्लंडनें मदत केली होती. युामुळें या दोन देशांमध्यें सलोखा जास्त होऊन व्यापारी करारमदारही एकमेकांना सवलती देण्याच्या तत्वावर झाले. यामुळें पोर्तुगालनेंही १८५४ मध्यें सोन्याचें एकचलनी नाणें सुरू केलें. याप्रमाणें चांदीची मागणी दोन देशांत अगदींच कमी झाली. त्याचा परिणाम बाजारभावाची चल