या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३५६ ]

शास्त्रज्ञ पैशाची संख्यात्मकमीमांसा म्हणून म्हणतात. तेव्हां या मीमांसेचा अर्थ काय व त्यांत सत्यांश किती आहे हें प्रथमतः पाहिलें पाहिजे.

देशामध्यें पैशाची संख्या वाढली म्हणजे पदार्थाच्या किंमती वाढतात व पैशाचें मोल कमी होतें. उलटपक्षीं देशांत पैशाची संख्या कमी झाली म्हणजे पदार्थांच्या किंमती उतरतात व पैशाचें मोल वाढतें. अर्थात् पैशाचें मोल हें पैशाच्या संख्येवर व त्याच्या चलनवेगावर अवलंबून आहे, असा अभिमतअर्थशास्त्रज्ञांचा सिद्धांत आहे. त्याचें स्पष्टीकरण एका काल्पनिक दाखल्यावरून करतां येईल. परंतु या सिद्धांतामध्यें कोणत्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत हें प्रथमतः ध्यानांत ठेविलें पाहिजे.

  पहिली गोष्ट- पदार्थाची अदलाबदल फक्त पैशानेंच होते म्हणजे  पतीचे व्यवहार किंवा ऐनजिनसी व्यवहार होत नाहींत.
  दुसरी गोष्ट–पैशाचा उपयोग विनिमयसामान्य एवढाच होतो.त्याचा कलाकौशल्याकडे किंवा शिल्लक टाकण्याकडे उपयोग केला जात नाहीं.
  तिसरी गोष्ट-सर्व पैसा चलनव्यवहारांत आणला पाहिजे व सर्व माल विकावयास काढला पाहिजे.

आतां अशी कल्पना करा कीं, दहा व्यापारी आहेत व त्या प्रत्येकाजवळ एक एक माल आहे व अकराव्या माणसाजवळ १०० रुपये आहेत, व सर्व मालाचें मोल सारखे आहे. अशा स्थितींत विनिमय सुरू होऊन सर्व माल विकावयास काढला व त्या माणसानें सर्व रुपयेही काढले तर प्रत्येक मालाची किंमत १० रुपये होईल. यावरून मालाची किंमत पैशाच्या संख्येवर व मालाच्या संख्येवर अवलंबून आहे हें उघड दिसतें.माल तितकाच राहून पैसे वाढले तर मालाच्या किंमती वाढतील व पैसे तितकेच राहून मालाची संख्या वाढली तर त्याच मानानें किंमती कमी होतील.

पहिल्या उदाहरणांत आतां अशी कल्पना करा कीं, पैसा जवळ असलेल्या माणसाला एकच वस्तूची जरूरी आहें. आतां तो १०० रुपये एक मालाला देईल. तसेंच पहिल्या व्यापान्यास दुस-या व्यापाऱ्याजवळची एक वस्तु पाहिजे आहे असें धरलें म्हणजे तोही त्या मालाबद्दल १०० रुपये देईल. शेवटीं शेवटच्या व्यापायाच्या हातांत १०० रुपये