या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (રૂદ્દ४) काम समजलें जातें व ह्मणून सुधारलेल्या सर्व देशांत सरकार परिवर्तनीय कागदी चलन चालू करतें. याला सरकारी चलनी नोटा ह्मणतात. या नोटा म्हणजे सरकारची मागितल्याबरोबर धातुरूप पैसे देण्याचीं लेखी वचनें होत व सरकारावर लोकांचा विश्वास असल्यामुळे अशीं लेखी वचनें प्रत्यक्ष धातुरुप पैशाप्रमाणें चालतात. परिवर्तनीय कागदी चलनाचा हा विशेष आहे कीं, या कागदी चलनाच्याबद्दल लोक मागतील तेव्हां धातुरूप पैसा दिला जाईल. अशी सरकार हमी घेतं.अर्थात या कागदी चलनाचें प्रत्यक्ष धातूच्या पैशामध्यें परिवर्तन करतां येतें. म्हणून या चलनी नोटांना प्रतिनिधिभूत पैसा ह्मणतात. हजारांची नोट काढली असतां तिच्याबद्दल हजार रुपयांची चांदी अगर हजार रुपये सरकार आपल्या तिजोरींत ठेवितें; व याचप्रमाणें जितक्या किमतीच्या कागदी नोटा आहेत तितक्या किंमतीची चांदी अगर रुपये या रूपानें सरकारी तिजोरींत प्रत्यक्ष ऐवज ठेवला जातो. ह्मणजे केव्हांही देशांतील कितीही माणसें नोटांबद्दल प्रत्यक्ष रुपये मागण्यास आलीं तरी हरकत पडत नाही. अर्थात कागदी चलनाच्या परिवर्तन या गुणाला केव्हांही बाध येतां कामा नये तरच या कागदी चलनावर लोकांचा पूर्ण विश्वास बसून त्यांकडून प्रत्यक्षपैशाचीं सर्व कार्ये होतील. परंतु जर का तिजोरींत मागितल्याबरोबर रोखपैसे मिळत नाहींत असें एकदां लोकांना वाटू लागलें म्हणजे ग्रेशॅमच्या नियमाप्रमाणें रोखपैशाचा उत्कर्ष होऊन कागदोपैशाचा अपकर्ष होऊं लागेल व देशांतून धातुरुप पैसा नाहींसा होईल. तेव्हां देशांत कागदी नाणें चालू ठेवावयाचें असेल तर त्याच्या परिवर्तनाला अर्थात त्याच्या बदला प्रत्यक्ष नाणें मिळण्याच्या गुणाला केव्हांच धक्का बसता कामा नये तर तो कागदी पैसा शास्रोक्त पैसा होय असें सर्व अर्थशास्त्रकारांचें मत आहे. परंतु कागदी पैशाचें हें परिवर्तन कायम ठेवण्यासंबंधी मात्र फार वाद आहे व त्या बाबतींत निरानराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी निरनिराळे नियम सांगितलेले आहेत. कागदी चलनाचें पूर्ण परिवर्तन ठेवण्याच्या कामीं निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केलेला आहे. तेव्हां ह्या तत्वांचा व पद्धतीचाही येथें थोडक्यात ऊहापोह केला पाहिजे.

   कागदी चलनाचें पूर्ण परिवर्तन राखण्याकरितां पेढीचें तत्व बस्स