या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

I 3\9\9 ] अनियंत्रित सरकार बनेल. तसेंच या पेढीमुळे खासगी व्यापारास धक्का बसेल व सराफ व पैशाची देवघेव करणारे यांचेपासून खासगी लोकांस फार त्रास होईल. अशा प्रकारच्या हजारों कुशंका त्या वेळीं निघाल्या; परंतु विल्यमच्या शहाण्या व धूर्त मंत्र्यांनीं भावी फायद्याकडे लक्ष देऊन आपलें म्हणणें तडीस नेलें. व पेढीच्या स्थापनेचा कायदा पास करून घेतला. बँकेच्या रकमेवर सरकारनें शेकडा आठ टक्केप्रमाणें व्याज देण्याचें ठरविलें. तसेंच सरकारचे कर वगैरे येतील तसतसे जमा करून सरकारास लागतील तसतसे पैसे देऊन सरकारचा जमाखर्च ठेवण्याचें काम या बँकेकडेच दिलें व या कामगिरीबद्दल ह्मणून आणखी चार हजार पौंड सालीना बँकेस देण्याचा ठराव झाला. म्हणून एकंदर दरवर्षी सरकाराकडून बँकेस एक लक्ष पौंडांचें कायमचें उत्पन्न झालें. शिवाय या बँकेस चलनी नोटा काढण्याचा अधिकार दिला. यामुळे पेढीस फार फायदा होऊं लागला. या पेढीचा व सरकारचा फार निकट संबंध असे. वेळोवेळीं पेढीची सनद फिरून दुरुस्त होऊन मिळत असे. या बँकेमुळे सरकारास वेळेवेळीं लागणारें कर्ज फार हलक्या व्याजानें मिळे. बँकेचें मूळचें भांडवल बारा लक्षांचें होतें. त्यांत वारंवार भर घालून तें पुढें कोटी पौंडांपर्यंत गेलें. ही पेढी इतर खासगी पेढ्यांप्रमाणें सर्व व्यवहार करी. या व्यवहारापासूनही तिला चांगला फायदा होत असे. याप्रमाणें या बैंकेची सारखी भरभराट होत गेली. पुढें चलनी नोटा काढण्याचा कारभार या बँकेच्या एका स्वतंत्र शाखेकडे दिला व नेहमींचें देवघवीचें काम दुस-या शाखेकडे दिलें. या बँकेचे सर्व हिशेब आठवड्याच्या आठवड्यास प्रसिद्ध होत. बँकेचें येणें किती, देणें किंती व बँकेच्या तिजोरीत शिल्लक किती याचा आढावा दर आठवड्यास काढीत असल्यामुळे लबाडी होण्याचा मुळींच संभव नसे. शिवाय या बँकेचा सरकारशीं निकट संबंध असल्यामुळे सर्व प्रजाजनांमध्यें या बँकेची साक फार मोठी असे, ह्मणून या बँकेच्या नोटा लोक खुशाल चलनी नाण्याप्रमाणें बिनदिक्कत वापरीत. बँकेच्या या पतीमुळेच सरकारास मोठमोठ्या खर्चाच्या लढाया चालवितां आल्या. कारण परकी देशांत लढायांकरितां पैसे रोख लागत. हे रोख पैसे बँकेजवळून घेत, व या बँकेंत सर्व देशांतील लोकांच्या ठेवी असल्यामुळे वेळप्रसंगीं वाटेल तितका पैसा या बँकेजवळ असे व त्याचा सरकारास उपयोग होई. बाहेर