या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३८०] पावली आहे. सर्व देशांतील व्याजाचा दर व कसरी किंवा कटमितीचा दर या बँकेच्या दरावर अवलंबून असतो. इतकें या बँकेचें व्यापारांत वजन आहे.असो.

                            -----------------------------------------
                                    भाग तेरावा.
                                 -------------------------
                               पेढीचें स्वरूप व उपयोग.
                            -----------------------------------------
 पेढीवाला म्हणजे कोण ? असा प्रश्न केला व त्याचा जरा बारकाईनें विचार केला तर आपणास असें उत्तर मिळेल कीं, पेढीवाला म्हणजे पैशाचा किंवा भांडवलाचा व्यापारी. पैशाची देवघेव करणारा सराफ म्हणजे पेढीवाला. पेढ्या तीन प्रकारच्या असतात. खासगी, संयुक्त भांडवलाच्या व सरकारी. खासगी पेढ्यांत असलेच तर फार थोडे भागीदार असतात व या भागीदारांच्या हातांत सर्व व्यवस्था असते. संयुक्त भांडवलाच्या पेढीचे पुष्कळ भागीदार असतात. ते स्वतः पेढीची व्यवस्था पाहात नाहींत; तर आपल्यांतील थोड्याजणांस पेढीचे डायरेक्टर नेमतात व डायरेक्टरांच्या हातीं सर्व व्यवस्था असते. शेतक-यांच्या फायद्यासाठीं सरकार स्वतः पेढ्या काढतें किंवा लोकांच्या उपयोगाकरितां सरकारी पोस्टखात्यामार्फत सरकार पेढीचें काम करतें. अशा प्रकारच्या पेढ्या सरकारी पेढ्या होत.
 अर्वाचीन काळीं पेढी ही मुख्यतः चार प्रकारची कामें करते. पेढीचें पहिलें कर्तव्य म्हणजे लोकांच्या ठेवी ठेवणें, पेढीचें दुसरें काम म्हणजे व्याजानें गिऱ्हाइकांस पैसे देणें, तिसरें काम चलनी नोटा काढणें व चवथें लोकांचे पैसे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं नेऊन पोंचतें करणें; यासच हुंडीचा व्यापार म्हणतात. आपल्याकडे पेढीचें शेवटलें मुख्य कर्तव्यकर्म समजलें जातें व 'पेढी' शब्द उच्चारल्याबरोबर हुंडीचा व्यापार करणारी संस्था हाच अर्थ प्रथमतः मनांत येतो. पेढीच्या या कर्त-