या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३९८ 1 या नफ्यातोट्याचा जास्त खोल विचार करणें म्हणजेच अप्रतिबंध व्यापार विरुद्ध संरक्षण, या अर्थशास्त्रांतील वादग्रस्त प्रश्नाचा विचार करणें होय. तरी तो या पुस्तकाच्या शेवटल्या भागांत करूं. आतां हा बहिर्व्यापार कोणत्या विनिमय सामान्यानें होतो हें पहावयाचें आहे तें पुढील एका लहानशा भागांत पाहून मग वर निर्दिष्ट केलेल्या वादग्रस्त प्रश्नाकडे वळूं. -

भाग पंधरावा. विनिमयपत्रें.

आतां बहिर्व्यापाराच्या विनिमय सामान्याचा ह्मणजे ज्याला मार्गे विनिमयपत्रें ह्मटलें आहे त्यांचा विचार करावयाचा आहे. तसेंच या भागांत चेक व हुंड्या यांचाही विचार करणें इष्ट आहे. कारण या विवेचनानें व्यावहारिक कागदी चलनांची माहिती.एकत्र ग्रथित होईल व यायोगानें मार्गे जो अधात्वात्मक चलनावर एक भाग लिहिला आहे त्याची या भागानें पूर्तता होईल. वरील तिन्ही प्रकारचीं कागदी चलनें हीं कायदेशीर चलनें असतात. तसेंच ती फक्त व्यापाराच्या व पेठ्यांच्या वाढीबरोबर आपोआप व व्यावहारिक तऱ्हेने प्रचारांत येतात हें मार्गे सांगितलेंच आहे. पेढीच्या विस्तृत मीमांसेनंतर पहिल्या दोन तऱ्हेच्या व्यावहारिक कागदी चलनांचें स्वरूप ध्यानांत येण्यास अगदींच सुलभ आहे. एकदां देशांत पेठ्यांचा प्रसार झाला व लोक आपली शिल्लक पेढ्यांजवळ ठेवू लागले ह्मणजे चेक हैं कागदीचलन स्वाभाविकपणें सुरू होतें. कारण चेक ह्मणजे ठेवी ठेवणारानें पेढीवर अमुक रक्कम अमक्या माणसासा द्यावी, असा हुकूम होय. जो मनुष्य नेहमीं पेढीशीं व्यवहार ठेवतो तो कितीही श्रीमंत असला तरी किरकोळ,अगदीं लहान व्यवहारास लागणा-या