या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४०१ ] आतां दोन देशांमध्यें पुष्कळ मालामध्यें बहिर्व्यापर चालतो. अर्थात् पुष्कळ माल देशांत आयात होत असतो व पुष्कळ तऱ्हेचा माल निर्यात होत असतो व यामुळे देशांत आयातव्यापारीही पुष्कळ असतात व निर्यात व्यापारीही पुष्कळ असतात. आयात व्यापा-यांस देशाबाहेर आयात केलेल्या मालाबद्दल पैसे पाठवावयाचे असतात तर निर्यात व्यापा-यांना दुस-या देशाहून पैसे घ्यावयाचे असतात. हे निर्यात व्यापारी सामान्यतः विनिमयपत्रे काढतात व हीं विनिमयपत्रें ते बाजारांत विकावयास नेतात व हीं विनिमयपत्रें आयात व्यापारी विकत घेतात. तेव्हां आयात व्यापारी हे विनिमयपत्राचे घेवारी असतात तर निर्यात व्यापारी हे विनिमयपत्राचे देवारी असतात व देशांतील आयात व निर्यात व्यापार सारख्याच किंमतीचा असला म्हणजे जितके पैसे देशाबाहेर पाठवावयाचे असतात तितकेच देशांत यावयाचे असतात. अशा स्थितींत एका देशांतून दुस-या देशांत रोख पैसा मुळींच पाठविण्याची गरज पडणार नाहीं. सर्व व्यवहार विनिमयपत्रांनींच पुरा होईल. कारण जितक्या रकमेची विनिमयपत्रे निघालेली आहेत तितकेच पैसे देशाबाहेर पाठवावयाचे आहेत. म्हणजे विनिमयपत्राचा पुरवठा व मागणी सारखी आहे. अशा स्थितींत विनिमयपत्रांतील रकमेइतके रोख रुपये त्या विनिमयपत्राबद्दल मिळतील. यालाच विनिमयपत्राचा समतोलाचा भाव ह्मणतात. परंतु कल्पना करा कीं, देशांत आयात माल निर्यात मालापेक्षां जास्त आला आहे. ह्मणजे देशाबाहेर जास्त पैसे पाठवावयाच आहेत. अशा स्थितींत आयात व्यापा-यांना कांहीं तरी रोख पैसे पाठवावे लागतील. परंतु परदेशीं रोख पैसे पाठविणें हें ब-याच खर्चाचें, त्रासाचें व धोक्याचें काम असतें व होतां होईल तों तें टाळण्यांत या व्यापा-यांचा फायदा असतो. यामुळें या आयातव्यापा-यांमध्यें विनिमयपत्रें विकत घेण्यांत चढाओढ सुरू होते व याप्रमाणें विनिमयपत्रांना मागणी जास्त झाल्यामुळें त्याचे भाव वाढू लागतात. म्हणजे विनिमयपत्रांतील रकमेपेक्षां जास्त पैसे त्या पत्राबद्दल मिळतात. अशा भावालाच विनिमयपत्राचा वर्तावळ्याचा भाव ह्मणतात. अशा स्थितींत निर्यात व्यापा-यांना त्याच्या विनिमयपत्रावर वर्तावळा मिळतो. परंत या वर्तावळ्यालाही मर्यादा आहे. आयात व्यापारी विनिमयपत्रें विकत घेतो याचें कारण या पद्धतीनें त्याला परदेशीं पैसे पाठविणें कमी खर्चाचें असतें. परंतु आयात व्यापा-यांच्या २६