या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४१८] ज्या मनुष्याला एकंदर मानसशास्त्राची सामान्य माहिती द्यावयाची आहे त्याला या सर्व स्वतंत्र होऊं पाहणाऱ्या अंगांचा अन्तर्भाव मानसशास्त्र या एकाच शास्त्रांत करावा लागतो व शास्त्राची एकरूपता दाखविण्याकरितां असें करणें इष्ट आहे. मात्र तो या अंगांचा फार विस्तृत तऱ्हेनें विचार करणार नाहीं. उदाहरणार्थ, शरीरमानसशास्त्र म्हणून एक मानसशास्त्राची स्वतंत्र शाखा होत आहे. यामध्यें मानसिक व्यापाराला अवश्य असणारा शारीरिक व्यापार व विशेषतः मेंदू व त्यांतील फेरफार यांचा विशेष तऱ्हेनें ऊहापोह केलां जातो. परंतु मन व मेंदू यांचा परस्पर संबंध व मानसिक व्यापाराच्या शारीरिक कारणांचा विचार हा मानसशास्त्राचाच एक प्रश्न आहे यांत शंका नाहीं. दुसरां दाखला अर्थशास्त्रांतील घेतां येईल. अर्थशास्त्रांतील सामाजिक पंथ याची हकीकत तिसऱ्या पुस्तकांत दिली आहे. सामाजिक पंथ हें एक स्वतंत्र शास्त्रच बनत चाललें आहे. याचें वाड़मयही फारं असून तें सारखे वाढत आहे. परंतु सामाजिक पंथाचा अन्तर्भाव अर्थशास्त्रांतच होतो व त्याची माहिती- थोडीबहुत- प्रत्येक अर्थशास्त्रावरील ग्रंथांत आलीच पाहिजे हें उघड आहे. तसेंच सहकारितेच्या तत्वासंबंधीं व त्या तत्त्वावर उभारलेल्या संस्थांचें सुद्धां स्वतंत्र वाङ्मय बनत आहे. परंतु यावरून तें एक स्वतंत्र शास्त्र झालें अशांतला अर्थ नाहीं. अशा तऱ्हेनें एखाद्या शास्त्रांतील निरनिराळ्या प्रश्नांसंबंधीं स्वतंत्र वाङ्गमय तयार होणें इष्ट आहे. त्याच्यायोगानें त्या विषयाचें ज्ञान वाढत जाऊन त्याचा समाजांत प्रसार होण्यास सवड जास्त होते. या दृष्टीनें राष्ट्रीय जमाखर्चाची एक स्वतंत्र शाखा बनत आहे हें कांहीं वावगें नाहीं व या विषयावर अगदीं सविस्तर अशीं पुस्तकें निर्माण होत आहेत हेंही वाईट नाहीं. परंतु जरी राष्ट्रीय जमाखर्चावर स्वतंत्र पुस्तकें झाली तरी हा विषय अर्थशास्त्रांतील एक पोटभाग आहे हें विसरतां कामा नये. वरील विवेचनावरून अॅडम स्मिथनें घातलेल्या प्रघाताचें शास्त्रीयदृष्टया कसें समर्थन करतां येतें हें दिसून येईल व म्हणूनच या ग्रंथांत सरकारी जमाखर्चाचा विचार अॅडाम स्मिथच्या संप्रदायाप्रमाणेंच करण्याचा विचार केला आहे. व अॅडाम स्मिथचें विवेचन अजूनही वाचनीय असल्यामुळे पुढल्या भागांत त्याच्या विवेचनाचा सारांश देण्याचा विचार आह. तेव्हां प्रथमतः सरकारची कर्तव्यकर्में कोणती व तीं