या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४३५] स्मिथनें केला नाहीं तर त्यानें एकामागून एक अशी सरकारच्या कर्तव्याची यादी दिली आहे. अर्वाचीन काळीं अर्थशास्त्रकारांनीं सरकारच्या कर्तव्यकर्माचें शास्त्रीय वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या कर्तव्यकर्माचें वर्गीकरण सरकारपासून प्रजेला होणाऱ्या फायद्याच्या तत्वानुरूप केलें आहे व त्याप्रमाणें एकंदर कर्तव्याचे चार पोटभेद होतात. कर्तव्यांचा पहिला वर्ग- ज्या कर्तव्याच्या अंमलबजावणीपासून देशांतील सर्व प्रजेचा फायदा होतो तो कर्तव्याचा पहिला वर्ग होय. या वर्गामध्यें देशांतील अन्तर्बाह्य शांतता राखणें हें मुख्य कर्तव्य होय. म्हणजे देशांतील सर्व लोकांचे जीवित व मालमत्ता यांचें सरंक्षण करणें हें तें कर्तव्यकर्म होय व हें साधण्याकरितां प्रत्येक सुधारलेल्या सरकारला सैन्य व फौजफांटा, आरमार, किल्ले, तटबंदी व पोलीस, वगेरे संस्था लागतात, या सर्वांचा मुख्य उद्देश जीवित व मालमत्ता यांना सुराक्षितता आणणें होय व यापासून अमुक व्यक्तीचा व फायदा व अमुक व्यक्तीस नाहीं असा मुळींच प्रकार नाही. यापासून सर्व प्रजेला सामान्य फायदा होतों. याच वर्गात दळणवळणाच्या साधनांचा, तसेंच प्राथमिक शिक्षण- सामान्य व औद्योगिक- या दोन कर्तव्यांचा समावंश होतो. या दोन्ही गोष्टी सरकारनें हाती घेतल्या पाहिजेत व शिक्षण तर सार्वत्रिक व सक्तीचें केलें पाहिजे, असें अर्वाचीन काळचें मत आहे, त्याचें कारण या गोष्टी प्रजेच्या सर्वसाधारण आयुष्याच्या आहेत व म्हणून त्या सरकारनें जीवित व मालमत्तेच्या संरक्षणाप्रमाणें आपल्या आद्य कर्तव्यापैकी समजल्या पाहिजेत. टांकसाळी व यासंबंधाचे सरकारचें कर्तव्यकर्म, तसेंच एकंदर उद्योगधंद्यांवर नजर ठंवर्ण हें या पहिल्या वर्गांतच मोडते