या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४३५१] ण्याची पद्धति; इत्यादि प्रकारचीं कर्तव्य्कर्में सुधारलेलें सरकार अर्वाचीन काळीं अंगावर घेतें. या सर्वांच्या मुळाशी हेंच तत्व आहे कीं, जरा या कतव्यकर्मापासून विशिष्ट व्यक्तींना-मग त्या संख्येनें पुष्कळ कां असेनातफायदा होत असला तरी सरकारनें हीं कामें हातीं घेतल्याखेरीज चालवयाचें नाहीं. कारण ज्या विशिष्ट लोकांना यापासून फायदा होणार त्यांना आपण होऊन या गोष्टी करणें त्यांच्या सांपत्तिक सामथ्याच्या मर्यादेबाहेरचें आहे. करितां हीं कर्तव्यकर्में सार्वजनिकच समजलीं पाहिजेत व त्यांना लागणारा खर्च सरकारनें आपल्या उत्पन्नांतून केला पाहिजे.

     कर्तव्यकर्माचा तिसरा प्रकार-यामध्यें ज्या कृत्यांना कांहीं विशिष्ट व्यक्तींना फायदा होऊन सर्वसाधारण लोकांनाही त्यांचा फायदा होतो, अशा कृत्यांचा समावेश होतो. म्हणजे सरकारच्या या कर्तव्यकर्माच्या अंमलबजावणीनें व्यक्तिफायदा व सामान्यफायदा असें दुहेरी हित होतें. या वर्गामध्यें न्यायकोर्टाची व्यवस्था, ज्या ज्या ठिकाणीं एखादा विशिष्ट धर्म सरकारनें अंगीकारला आहे तेथें तेथें त्या धर्मखात्याचा खर्च, पोस्ट व तारायंत्र खातें, ( हीं केव्हां केव्हां चवथ्या वर्गांतही धरलीं जातात. ) हक्कनोंदीची व्यवस्था; तसेंच कांहीं विशिष्ट धंद्यांना व उद्योगांना दिलेल्या सवलती व बक्षिसें, या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष व पहिला उपयोग कांहीं विशिष्ट व्यक्तींना होतो खरा; तरी पण त्याचा अप्रत्यक्ष व दुसरा उपयोग बहुजनसमाजाला होतो. उदाहरणार्थ, जरी न्यायकोर्टाचा प्रत्यक्ष उपयोग न्यायकोर्टाची पायरी चढणारांना होतो तरी न्यायाची व्यवस्था चोख असली म्हणजे एकंदर जीवित व मालमत्ता यांची सुरक्षितता वाढते व याचा फायदा सर्वत्रांनाच मिळतो. त्याप्रमाणें जरी उद्योगधंद्यांच्या संरक्षणानें प्रत्यक्षतः कांहीं कारखानदार व कांहीं व्यापारी इतक्या व्यक्तींनाच फायदा होतो तरी एकंदर देशाची सांपत्तिक स्थिति सुधारल्यामुळें अप्रत्यक्ष रीतीनें सर्व लोकांचाच फायदा होतो.
    कर्तव्यकर्माचा चवथा प्रकार-यामध्यें सरकार जीं कृत्यें करतें त्यांचा उद्देश फक्त विशिष्ट व्यक्तींच्या फायद्याचा असतो किंवा सरकारला इतर कर्तव्यकर्में बजावतां चावीं म्हणून जें उत्पन्न पाहिजे असतें तें उत्पन्न मिळविण्याचा हेतू असतो. सरकार जे प्रत्यक्ष  उद्योगधंदे हाती घेतें त्यांचा यांत