या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

223 पेक्षां अप्रत्यक्ष करच जास्त चांगले असें म्हणतात. कारण अप्रत्यक्ष कर हे वसूल करण्यास फार साेईचें असतात. शिवाय अशा करांत सक्तीचा अमल किंचित कमी असतो; निदान तो लोकांच्या डोळ्यांपुढे तरी फार येत नाही. कारण हा कर पदार्थाच्या वाढलेल्या किंमतीच्या रुपानें दिला जातो. शिवाय कर द्यावयाचा नसल्यास कर बसलेला माल न घेतल्यानें आपल्याला करापासून आपली सुटका करून घेतां येते. या दृष्टीनें अप्रत्यक्ष कर हे सरकारला व प्रजेला असे दोघांनाही सोईस्कर असतात. यामुळें सुधारलेल्या सरकारची प्रवृत्ति या कराकडे बरीच आहे. पंरतु एकंदर उत्पन्नाच्या स्थितीचा विचार करण्यापूर्वीं कराच्या तत्वांचा आतां विचार केला पाहिजे.

                         भाग पांचवा.
                         कराचीं तत्वें.
     ज्याप्रमाणें अॅडाम स्मिथचें श्रमविभागाचें विवेचन एकदम सर्वमान्य झालें किंवा ज्याप्रमाणें त्याचें मजुरांच्या व नफ्याच्या विविधतेच्या कारणांचें विवेचनही एकदम पसंत झालें व पुढील अर्थशास्त्रकारांनीं अॅडाम स्मिथचें विवेचन बहुतेक त्याच्याच शब्दांनीं सांगितलें, त्याप्रमाणें कराच्या तत्वाच्या विवेचनाची गेष्ट आहे. अॅडाम स्मिथच्या पहिल्या तत्त्वाच्या अर्थाबद्दल मात्र पुष्कळ वाद माजून राहिलेला आहे, हा वाद अॅडाम स्मिथच्या म्हणण्याच्या अर्थाबद्दल म्हणण्यापेक्षां त्या म्हणण्यांत अन्तर्भूत झालेल्या परस्परविरोधी उपपत्तीच्या सयुक्तिकपणाबद्दल आहे.
     कराचें पहिलें तत्त्व-कराची समता- "प्रत्येक देशांतील प्रजाजनांनीं आपल्या सरकारच्या योगक्षेमाकरितां होतां होईल तों आपापल्या ऐपतीप्रमाणें कर दिला पाहिजे; अर्थात् सरकारच्या सुरक्षित छत्राखालीं आपल्याला ज्या उत्पन्नाचा उपभोग घेण्यास सांपडतो त्या उत्पन्नाच्या मानानें प्रत्येकानें कर दिला पाहिजे. सरकारचा खर्च हा एखाद्या संयुक्त माल