या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ 22<] संपात शोधून काढणें अवश्यक आहे. कारण यायोगानेंच कराचीं तत्वें पाळली जात आहेत किंवा नाहींत हें समजून येणारें आहे. परंतु येथें अशी एक शंका निघण्याचा संभव आहे कीं, कराच्या संपाताची मीमांसा मुळींच कठीण नाही. कारण ज्याअर्थी करांचें वर्गीकरणच मुळी या तत्वावर केलेले आहे. त्याअर्थी कर कोणत्या वर्गातील आहे हे ठरविलें कीं काम झालें. कारण ज्या करामध्यें कर देणारा व कर सोसणारा या व्यक्ति एकच असतात तो प्रत्यक्ष कर होय, अशी मागे ।प्रत्यक्ष कराची व्याख्या केली आहे. तेव्हा प्रत्यक्ष करामध्यें कर देणारावरच कराचा संपात आहे. अर्थात प्रत्यक्ष कराचा बोजा कर देणारावरच पडतो हे उघड झालें. याच विचासरणीप्रमाणें अप्रत्यक्ष कराचा संपात कर देणारावर न पडतां दुस-या व्यक्तीवर पडतो हेंही उघड होते. सकृतदर्शनी हा कोटीक्रम खरा वाटतो. परंतु तो बरोबर नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर हे वर्गीकरण कराच्या संपाताच्या तत्वाला अनुसरून केलेले आहे ही गोष्ट खरी आहे . परंतु या कराच्या वर्गीकरणामध्यें सरकाराचा हेतू विशेष तऱ्हेने दिसून येतो. मात्र वस्तुस्थिति तशीच बनते असे मात्र नाही. प्रत्यक्ष कराचा बोजा कर देणारावर पडावा अशी सरकारची इच्छा असते व याच हेतूनें तो कर बसविलेंला असतो खरा तरी अर्वाचीन काळच्या व्यवहाराच्या संकीर्ण स्वरूपामुळे तसें सदोदित होतेच असें नाहीं. उलटपक्षी अप्रत्यक्ष कर कर देणारावर पडू नयेत अशी सरकारची इच्छा असते परंतु ती इच्छा सदासर्वदा परिपूर्ण न्यत:खरे असले व ते जमाखर्चाच्या दृष्टीने सोईचे असले तरी त्यावरून कराची संपातमीमांसा पुरी होते असें काही नाहीं.कर शेवजी कोणत्या व्यक्तीवर किवा व्य्क्तीसमूहावर पडतो याची स्वतंत्र मीमांसा करणे जरूर असते.कारण प्रत्यक्ष कराचे ओझेही काही परिस्थितीत दुसऱ्यावर टाकता येते, तर अप्रत्यक्ष कराचे ओझे केव्हा केव्हा कर देणावरच पडते. तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर हे वर्ग जरी सामान्यतः बरोबर असले तरी त्यावरून कराच्या प्रत्यक्ष संपाताची बरोबर कल्पना होणार नाही . या करिता अर्थशास्त्री सुधारलेल्या देशातील प्रमुख करांची उदाहरणे घेऊन कराच्या संपाताचा विचार करितात .तोच मार्ग येथे स्वीकारणे.