या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ છદ્ર ] 'गैरसोय होत नाहीं; उलट आपल्या आरमाराच्या व सैन्याच्या विजयाच्या बातम्या व वर्णनें वर्तमानपत्रांतून स्वस्थपणें वाचावयास सांपडतात. शांततेच्या काळाच्या करापेक्षां फार थोड्या प्रमाणानें वाढलेल्या कराच्या वाढीचा मोबद्ला म्हणून लढाईची करमणूक अशा लोकांना बस्स असते. यामुळें लढाई संपून शांतता झाल्यास हे लोक नाखुष असतात. कारण लढाई जास्त दिवस चालल्यानें होणा-या करमणुकीला व राष्ट्रीय वैभवाच्या व जयाच्या काल्पनिक तरंगमुखाला ते मुकतात." अर्थशास्त्रदृष्ट्या कर्जानें लढाई चालविणें म्हणजे आपल्या छ्त्यांची फळें पुढील सर्व पिढ्यांस भोगावयास लावण्यासारखे आहे. कारण या कर्जाच्या व्याजाचा बोजा सततचा असतो व तो पुढील सर्व पिढ्यांस सोसावा लागतो. एखांद्रे युद्ध, दुस-या राष्ट्रानें अन्यायानें आपल्यावर हल्ला केला असतां स्वसंरक्षण करण्याकरितां फक्त जर असेल, तर त्यांत पुढील पिढीचा संबंध आहे व्र अशा वेळीं राष्ट्रीय कर्ज काढणें रास्त आहे; परंतु सरकारच्या चुकीनें किंवा साम्राज्यमदधुंदीने एखादें युद्ध सुरू झाल्यास त्याबद्दलचा खर्च दुस-या पिढ्यांवर घालणें अन्यायाचें होईल. यामुळें लढाईचा खर्च होतां होईल तों अधिक करानें उत्पन्न करणें न्याय्य आहे, असें कित्येक अर्थशास्त्रज्ञांचें व मुत्सद्यांचें मत आहे. प्रसिद्ध लिबरल मुत्सद्दी ग्लॅडस्टन हे दुस-या मताचे होते. "लढाई सुरू करण्याची जबाबदारी जे लोक आपल्या शिरीं घेतात, त्यांनीच तिच्या खर्चाची जबाबदारी अंगावर घेतली पाहिजे व अर्वाचीन काळीं लढाईस लागणारा अवाढव्य खर्च हा एक लढाया कमी होण्याकरितां ईश्वरनिर्मित आाळा आहे व म्हणूनच सरकारानें लढाई सुरू करणें म्हणजे एक अत्यंत बिकट व पवित्र कर्तव्य आहे असें समजलें पाहिजे" असें आपल्या एका भाषणांत त्यांनीं म्हटलें आहे. मिस्टर ग्लॅडस्टन यांनीं क्रिमियन लढाईचे वेळीं होतां होईल तोंं कर्ज काढावयाचें नाहीं व लढाईचा खर्च इतर काटकसर व कराची वाढ या दोन तजविजींनीं भागवावयाचा निश्चय केला होता. हा त्यांचा निश्चय सिद्धीस गेला नाही व त्यांना सुद्धां कर्ज काढण्याचा प्रसंग आला ही गोष्ट निराळी. असो. सरकारास कर्ज काढण्याचें तिसरें कारण म्हणजे उत्पादक धंद्यांकरितां भांडवल पुरविण्यासाठीं लागणारा खर्च हें होय. सरकारास कर्ज काढ- ३०