या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४७८] फाजील समज, त्यांत ईस्ट इंडिया कंपनीच्या विलक्षण फायद्याच्या व्यापारावरून व कंपनीच्या नोकरांना थोडया दिवसांत खासगी त-हेनें मिळालेल्या विलक्षण किफायतीवरुन तो समज जास्त वाढला होता. तेव्हां अशा स्थितींत बंगालसारख्या सुपीक व संपन्न प्रांताचा आधिकार कंपनीच्या हातांत आल्यावरोबर ज्याच्या त्याच्या तोंडास पाणी सुटले. कंपनीच्या भागीदारांना व्याज वाढविण्याची घाई झाली. त्यांनीं शेंकडा ६ टक्कयापासून १२॥ टक्क्यांपर्यंत आपल्या भागांचें व्याज वाढविण्याचा सपाटा चालविला. परंतु इंग्रजीमंत्रिमंडळाला हें करणें आवडलें नाहीं. कारण इंग्रजसरकारचा असें करण्यापासून तोटा होता. एवढ्या मोठ्या शिकारींतील त्यांच्या बांट्यास कोणताच तुकडा येईना; सर्वच भागीदार घेऊं लागले. परंतु कंपनीच्या भागीदारांना शह देण्याची शक्ति मंत्रिमंडळांत होती; कारण इंग्लंडच्या राजापासून कंपनीस व्यापाराची व प्रांताचा अंमल चालविण्याची सनद मिळालेली होती. तेव्हां या अधिकाराप्रमाणें १७६९ मध्यें मंत्रिमंडळानें पार्लमेंटांत एक कायदा पास करून घेतला. त्या कायद्यांत कंपनीला नवीन मिळविलेल्या प्रांतावर ५ वर्ष अंमल चालविण्याची परवानगी दिली व त्याबद्दल कंपनी सरकारनें इंग्रजी खजिन्याला दर वर्षी ४ लक्ष पेोंड द्यावे तसेंच आपल्या भागावरील नफा एकदम ११॥ टक्के न करतां प्रत्येक वर्षी एक एक टकयाप्रमाणें १२॥ पर्यंत वाढवीत जावा व जास्त शिल्लुक राहिल्यास कंपनीनें आपलें Bond debt कमी करावें, असें ठरविलें. हा अॅक्ट बंगालच्या दिवाणीपासून विलक्षण फायदा होणार अशा समजावर केलेला होता. परंतु त्या समजाप्रमाणें प्रांताचा खर्चवेंच जाऊन उत्पन्न होईना व इकडे तर डायरेक्टरांचे खलित्यावर खलिते, कीं पुष्कळ पैसे पाठावले पाहिजेत. मग कंपनीसरकारच्या नोकरांना जुलुमानें राजेराजवाडे यांचेकडून पैसे कसे घ्यावे लागत, याचें सुंदर वर्णन मेकॉले व बर्क या दोन मुत्सद्यांच्या पुस्तकांत पुष्कळ ठिकाणीं आलेलें आहे. नवीन प्रांत मिळाल्यापासून कंपनीसरकारचा हिंदुस्थानांतल्या राजेराजवाडयांशीं संबंध येऊं लागला व नेहमीं लढाया व तंटेबखेडे होऊं लागले व त्यामुळे लष्करी खर्च वाढत चालला. विलायतेंतील डायरेक्टकरांचा तर पुष्कळ माल खरेदी करून पाठवून देण्याचा तगादा आतां डायरेक्टर तिकडून पैसे पाठविनासे झाले. गल-