या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४८१] पासून १८४४ पर्यंत मारली. या सालांत लॉर्ड ऑक्लंडला अफगाण लढाई ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या सांगीवरून सुरू ठेवावी लागली व हिंदुस्थानचें कर्ज १८३९ मध्यें ३|| कोटी होतें तें ४।| कोटी पौंड झालें. ही लढाई ब्रिटिश सरकारच्या धोरणावरून सुरू झाली; परंतु एका कोटीचा खर्च हिंदुस्थानास भरावा लागला. या वेळीं कंपनी सरकारानें सुद्धां या अन्यायाबद्दल ब्रिटिश मुत्सद्यांजवळ तक्रार केली, परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. पुढें सिंधप्रांत काबीज केला गेला. लॉर्ड डलहौसीसाहेबांनीं तर नेटिव्ह संस्थानें खालसा करण्याचा सपाटा चालविला. त्यामुळे व इतर कारणांनीं १८५७ सालचें शिपायांचें बंड झाले. या बंडाच्या शमनार्थ एका वर्षात १ कोटेि पेोंड खर्च आला. बंडाचे पूर्वी हिंदुस्थानचें कर्ज ६ कोटी पौंड होतें तेंच दुसरे वर्षी ७ कोटी झालें. बंडाचां एकंदर खर्च ५ कोटी पौंडांवर झाला. पुढें हुंडणावळीच्या भानगडीमुळें व दुस-याही किरकोळ खात्यांकरितां व दुष्काळाकरितां हिंदुस्थानचें राष्ट्रीय कर्ज वाढत चाललें व नंतर रेल्वे व पाटबंधारे या उत्पादक कामाकरितां कर्ज होऊं लागलें. १९०८।१९०९ साल अखेरची हिंदुस्थानच्या कर्जाची स्थितेि खालील अांकडयांवरून दिसून येईल.

   हिंदुस्थान सरकारचें १९०९ अखेर कायमचें कर्ज.
         हिंदुस्थानांत ८९७१०७०० पोंड 
         विलायतेस १६६९७३३६९ पैोंड 
   व्याज यावें लागणा-या कायम व तात्पुरत्या एकंदर कर्जाचा अांकडा.
         हिंदुस्थानांत ९११ ११०६० पौंड 
                 १७६०८९३२७ पौंड
             एकूण २६७२००३८७ पोौंड

३१