या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४९६] रोग्याला कृतघ्न म्हणू लागतो. “अरे, मीं तुला मरतां मरतां वांचविलें, बेशुद्ध तून शुद्धीवर आणले. आणि असें असूनही माझ्या औषधयोजनेला नॉर्वे ठेवतोस तेव्हां तूं किती कृतघ्न व मित्रद्रोही आहेस? अशा त-हेचे डॅाक्टरच्या तोंडून साहजिक उद्धार निघतात. परंतु यास रोग्याचा तरी काय इलाज असतो; तो किती तरी महिने खितपत पडलेला असतो; हृातपाय हलविण्याचें त्याला सामर्थ्य नसतें; आपल्यामागून आजारी पडलेले रोगी याच औषधयोजनेनें आपल्या आधी व धटृेकटे झालेले व निरोगी व सशक्ती माणसाप्रमाणें जिकडे तिकडे वावरतांना पाहून अंथरुणाला खिळलेल्या माणसानें उतावीळ व्हावें व आपल्याला अजून गूण येत नाही, म्हणून डॅाक्टरास व त्याच्या औषधयोजनेस त्यानें शिव्याशाप देऊं लागावे हे मनुष्यस्वभावास धरून आहे. परंतु अशा स्थितींत डॉक्टराने रोग्यावर न संतापतां पली औषधयोजना चालू ठेवावी व ती चालू ठेवणें हेंच शहाणपणाचें आहे हे उघड आहे. उपमा टाकून स्पष्टपणें बोलावयाचें म्हणजे या विषयावर लिहिणें हल्लीच्या स्थितीत फार नाजूक काम झालें आहे. कारण अर्थशास्त्रांतील विषयांचा राजकीय विषयांशीं फारच निकट संबंध आहे व हल्ली ब्रिटिश सरकारच्या मनांत हिंदी प्रजेच्या राजनिष्ठपणाबद्दल शंका उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे सरकारी अंमलदारांस हल्ली कोठे राजद्रोह दिसेल याचा नेम नाही.अशी स्थिति उत्पन्न होण्यास आमच्यांतील कांहीं जबाबदार लेखक व वक्त हे कारणीभूत झालेले आहत हेही कबूल करणें भाग आहे. कारण मनुष्या- मनुष्यांमधले सर्व व्यवहार विश्वासावर अवलंबून आहेत व काही कारणाने हा विश्वास एकदां उडाला म्हणजे अगदीं साध्या व स्वाभाविक कृत्याबद्दल हा मनुष्याच्या मनांत संशय उत्पन्न होतो. हा मनुष्यस्वभाव आहे. याकरिता तांच लोकांचे पुढारी म्हणविणाऱ्या लोकांनीं ही गोष्ट मनांत ठेवून आपलं वर्तन ठेविलें पाहिजे. असो, तेव्हां सध्यां स्थिति नाजुक झालेली आहे ही गोष्ट सिद्ध आहे व यामुळेच या विषयावर लिहिणें कठिण झालेलं आहे. परंतु या लेखकाला जें जें सत्य वाटत आहे, तें तेच तो या ठिकाणी लिहित आहे. परंतु त्या सत्य वाटत आहे अशी त्याची समजूत आहे म्हणून त्यानें त्या लिहिल्या आहेत. त्याचा उद्देश द्वेषबुद्धि वाढविण्याचा नाहीं हें येथें सांगणें जरूर आहे. मानवी संस्था