या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५१८] व सावकार त्याला चिट्टीचपाटीशिवाय कर्ज देई. व चिट्टीचपाटी घेतली तरी बिन खर्चानें होई. कारण शेतक-याची कर्ज बुडविण्याची बुद्धिच नसे. ‘कर्जाला मुदत ? ' कांहीं काळानंतर मुदतीबाहेर जाणें ? या कल्पना ठाऊकच नव्हत्या. अझून सुद्धां पाश्चात्य कल्पनांनीं दूषित न झालेल्या माणसास मुदतीनें कर्ज नाहींसें कसें होतें हें समजत नाहीं. कर्ज ह्मणजे कर्ज व आपल्याला सवड होईल तेव्हां तें दिलें पाहिजे ही अशा माणसाची बुद्धेि. शेतक-याच्या या अज्ञानाची व त्यापासून शेतक-याच्या होणा-या नुकसानाची निदर्शक अशी एक गोष्ट येथें सांगण्यासारखी आहे. एक इंग्रजी कायद्याच्या नव्या कल्पनांचा गंधही नसलेला साधा भोळा जुन्या चालीचा शेतकरी होता. त्यावर एका सावकारानें कर्ज घेतल्याबद्दल व तें परत मागण्याबद्दल फिर्याद लावली. कर्जरोखा वगेरे कांहीं नव्हता. तोंडचा करार करुन कर्ज घेतलें होतें असें फिर्यादीचें म्हणणें होतें. हा शेतकरी कोर्टापुढें आला व त्यानें सरळ उत्तर दिलें कीं, मी या सावकाराचें कर्ज घेतलें होतें; परंतु तें मी परत केलें आहे. तेव्हां आतां याचें मी कांहीं एक देणें नाहीं. यावर कोर्टानें सांगितलें कीं तुला देणें कबूल आहे, तब्हां ही गोट आतां शाबीद झाली. परंतु तूं तें कर्ज परत केलेंस याला आतां पुरावा आणला पाहिजे. यावर तो शेतकरी उत्तर देतों."याला पुरावा कसला? मी कर्ज घेतलें होतें असें मीच सांगितलें व मीं कर्ज परत केलें असेंही मींच सांगितलें. तर माझीं दोन्हीं ह्मणणीं तरी खरीं असलीं पाहिजेत किंवा दोन्हीं खोटीं असलीं पाहिजेत." परंतु इंग्रजी कायद्याप्रमाणें कोर्टाला हें पसंत नव्हतें. आपल्याविरुद्ध जाणा-या आपल्याच विधानाला स्वत:च्या कबुलीखेरीज दुसरा पुरावा लागत नाहीं. परंतु आपल्या हिताच्या ह्मणण्याला स्वतंत्र पुरावा पाहिजे असें इंग्रजी कायद्याचें तत्व आहे. परंतु याची भोळसर शेतक-यास कल्पना होईना. कारण तो म्हणे " माझे जर एक म्हणणें तुम्हीं खरें मानतां तर दुसरेंही खरें मानलेंच पाहिजे. " परंतु इंग्रजी कायद्याप्रमाणें या खटल्यांत सावकारास दावा मिळतो. कारण प्रतिवादी कर्ज कबूल करती तेव्हां तें शाबीद ठरतें व कर्ज परत केल्याबद्दलचा पुराव्याचा बोजा प्रतिवादीवर पडतो व तसें त्याला करतां न आल्यास त्याच्यावर दावा लागू होती. या कज्ज़ांत जर प्रतिवादीनें दोन्हीं गोष्टीसंबंधानें कानावर हात ठेविले असते - मी कर्ज घेतलें नाहीं व मला परत केल्याचें माहिती नाहीं असें म्हटलें असते -