या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५१]

 पाणी वर येतें तें मनुष्याच्या शक्तिनें किंवा एंजिनाच्या शक्तिनें येतें. या ठिकाणीं मानवी शक्ति व एंजिनाची शक्ति हें त्याचें मूर्त कारण तर हवेचा दाब हें त्याचें अमूर्त कारण होय. आपण दगड हातांतून फेंकला म्हणजे तो जमिनीवर आपटतो. याचें मूर्त कारण आपण त्यास दिलेला गति होय, पण त्याचें अमूर्त कारण गुरुत्वाकर्षण होय. एखाद्या कार्याला अमूर्त कारणें मूर्त कारणांइतकींच अवश्यक असतात. अमूर्त व मूर्त यांमध्यें अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कारणें असा परंपरेचा संबंध नसती. दोन्हीं कारणें त्या कायचिों प्रत्यक्ष कारणेंच असतात. परंतु अमूर्त कारणें त्याच कार्याला अनन्य सामान्य असतात असें मात्र नाहीं. त्या कारणापासून आणखीही पुष्कळ कार्ये होत असतात. तेव्हां अमूर्त व मूर्ती यांमध्यें सामान्य-विशेष असा संबंध असतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां प्रथमतः संपत्तीच्या उत्पतीचीं अमूर्त कारणें कोणतीं याचा विचार पुढील भागांत करूं.

भाग दुसरा.
संपत्तीचीं अमूर्त कारणें.

 देशांतील संपत्तीची उत्पति व वाढ करणारें पहिलें अमूर्त कारण मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा होय. संपत्तीची व्याख्या करतांना संपत्ति ही कोणाच्या तरी मालकीची असली पाहिजे, अर्थात तिच्यामध्यें अधीनता हा गुण असला पाहिजे हें मागें सांगितलेंच आहे. आतां या संपत्तीच्या गुणाचा व संपत्तीच्या पहिल्या अमूर्त कारणाचा निकट संबंध आहे. कारण देशामध्यें खासगी मालकीचा हक्क प्रस्थापित होऊन त्याला स्थैर्य आल्याखेरीज खासगी मालकी हा गुण संपत्तीत येऊं शकणार नाहीं. अर्थात् मालमत्तेचा व जीविताचा सुराक्षितपणा हा मालकीहक्क प्रस्थापनेचा पायाच आहे. हा सुरक्षितपणा देशांत स्थापित करून तो सतत टिकविणें हें सुधारलेल्या राज्यपद्धतीचें पहिलें व प्रमुख कर्तव्यकर्म समजलें जातें. ज्यामध्यें समाजव्यवस्था व सुयंत्रित राज्यव्यवस्था सुरू