हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५२]


झालेली नसते अशा अगदीं रानटी स्थितीमध्यें "बळी तो कान पिळी" हा न्याय असतो. अशा स्थितींत खासगी मालकीहक्क मानला जात नाहीं, व यामुळे अशा स्थितींत संपत्तीची वाढ होऊं शकत नाही; कारण आपल्या श्रमाचें फळ आपल्याला उपभाेगण्यास मिळेल अशी खात्री नसते. आज आपण मोठे श्रम करून एखादी वस्तु तयार केली तर उद्यां एखादा शिरजोर माणूस येऊन ती वस्तु आपल्यापासून हिरावून नेईल अशी भीति सर्वांस असते. यामुळे संपात्ति उत्पन्न करण्याचे श्रम घेण्यास कोणीही धजत नाहीं. वरील विवेचनावरून या अमूर्त कारणाचें स्वरुप ध्यानांत येईल. मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा हा संपत्तीच्या वाढीचा मूळ पाया आहे, व राखणें हें आपलें आद्य कर्तव्यकम समजतें. देशांतील प्रचंड सैन्यें व आरमारें, देशांतील पोलिसखातें व न्यायखातें, व देशांतली दळणवळणाचीं सुधारलेलीं साधनें वगैरे सर्व गोष्टींनीं हा सुरक्षितपणा स्थापन केला जातो व राखला जातो. कारण हा सुरक्षितपणा सार्वत्रिक होण्यास देशांत नेहमी शांतता पाहिजे. तेथें लढाया होतां कामा नयेत, आपसांत मारामाऱ्या दंगधोपे होतां कामा नयेत, व्यक्तीच्या हक्काचें उत्तम त-हेनें संरक्षण झालें पाहिजे, व्यक्तीव्यक्तीमध्यें न्याय उत्तम मिळाला पाहिजे. सारांश, देशामध्यें कायद्याचें साम्राज्य पाहिजे. व्यक्तीचे हृक स्पष्टपणें निर्दिष्ट होऊन त्याप्रमाणें राज्यव्यवस्था सारखी चालली पाहिजे. अशी जेव्हां सुधारलेली राज्यपद्धति देशांत प्रचलित असेल त्याच वेळीं मालमत्तेला व जीविताला उत्तम सुरक्षितपणा आला आहे, अशी मनुष्याच्या मनाची खात्री होते व मग मनुष्याला श्रम करण्यास स्फुरण येतें व त्यामुळे संपत्तीची झपाट्यानें वाढ होते. कारण या स्थितींतच आपण केलेल्या श्रमांचे चीज होऊन आपल्याला व आपल्या मुलाबाळांना आपल्या श्रमाचा फळें उपभोगण्यास सांपडतील अशी खात्री समाजांतील व्यक्तीच्या मनांत उत्पन्न होते.
 मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा व संपत्तीची वाढ यांचा कार्यकारण संबध आहे हें जगांतील निरनिराळ्या देशांच्या इतिहासावरून सिंद्ध करतां येतें व या याेगें या अमृत कारणाच्या सत्यतेबद्दल