हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५५]

राजांनीं हें प्रथम स्थापन केलें. त्यांचे काळीं त्या साम्राज्यांत सुयंत्रित राज्यव्यवस्था होती व म्हणूनच साम्राज्यांत सांपत्तिक भारभराटही झाली.या साम्राज्याखालीं असणारे प्रांतही फार सुपीक असून सृष्टीदेवीचे जणूं कांहीं आवडते होते. इतकी विपुल स्वाभाविक संपत्ति व सृष्टीशक्ती या प्रांतांत होती. परंतु अशा प्रकारच्या संपत्तीच्य वाढीस अनुकूल सर्व स्वाभाविक गोष्टी असतांना हें प्रांत हजारों वर्षें ओसाड पडले व बहुतेक निर्जन बनले.या सांपत्तिक ऱ्हासाचें कारण पुढील राजांची अनियंत्रित सत्ता व त्याच्या योगानें लोकांना लागलेल्या वाईट संवयी होत.परंतु या सर्व गोष्टींचे पर्यवसान मालमत्तेची व जीविताची सुरक्षितता नाहींसें करण्यांत झालें.कारण या सर्व साम्राज्यांत सुयांत्रित राज्यव्यवस्था राहिली नाहीं.सरदार लोक व जमीनदार आपआपसांत तंटेवखेडे करीत;त्यांना आपल्या शेजारच्या लोकांना लुटून आपली तुमडी भरण्याची संवय लागली.या सवयींमुळें स्वतः श्रम करण्याची बुद्धि कमी झाली व इतर लोकांमध्यें मालमत्तेची सुराक्षितता नाहींशीं झाली.यामुळें संपत्तीचा सर्व झराच मुळीं आटून गेला व हे अत्यंत सुपीक प्रांत ह्लांत व दारिद्र्यांत राहणाऱ्या लोकांचे वस्तीचे प्रांत बनले. तेव्हां पर्शियन साम्राज्याच्या ताब्यांत असलेल्या प्रांताच्या सांपत्तिक अवनतीचें मूळ मालमत्तेच्या व जीविताच्या सुरक्षितपणाच्या आभावांत आहे व हा आभाव अंदाधांदीचा व मोंगलाई राज्यपद्धातीचा परिणाम होय. कारण या हजारों वर्षे बहुतेक ओसाड बनलेल्या प्रांतांत जेथें जेथें सुयांत्रित राज्यपद्धति सुरु होऊन मालमत्तेला व जीविताला सुरक्षितता आलेली आहे तेथें तेथें पुन्हा हे भाग सांपत्तिक भरभराटीच्या मार्गाला लागलेले दृष्टोत्पत्तीस येतात.
 या सिद्धांताचें समर्थक असें अर्वाचीन काळांतील उदाहरण म्हणजे आयर्लेंड देशाचें आहे. त्या देशांत बहुत काळपर्यंत सुव्यावास्थित राज्यपद्धति सुरु झाली नाहीं व तेथील लोकांमध्ये लुटारूपणाची प्रवृत्ति फार काळ राहिली व हा देश रोमन लोकांच्या ताब्यांत कधींच न गेल्यामुळें तेथें रोमन कायद्याची पद्धति युरोपच्या इतर प्रांतापेक्षां फार मागाहून सुरु झाली. खरोखरीं आयार्लेंडात इंग्रजांनीं रोमन कायदे नेले. आयरिश लोकांमध्ये आपआपसांत तंटे करण्याची प्रवृत्ति फार होती. तसेंच अंतःकलह व द्वेष हे फार होते. यामुळें मालमत्तेला व जीविताला विशे-