या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५८]


वाढ अक्षरशः अमर्याद आहे. आतां वासनांची वाढ समाजाच्या आधिभौतिक सुधारणेचें मूळ होय, हें खालील विवेचनावरून ध्यानांत येईल.
 वासनाछेदाचें उद्दिष्ट जर मनुष्यानें आपल्यापुढें ठेविलें व त्याप्रमाणें जूर बहुजनसमूजावें खरोखरीच वर्तन होऊं लागलें तर संपत्तीच्या आधिभौतेिक सुधारणेची देोलेजंग इमारत ढांसळून पडलीच पाहिजे. समाजांतील सर्व व्यकी जर ग्रीक संन्याशी डायोजिनीसनपणें एका द्रोणांत राहूं लागल्या व त्यांच्या उपजीविकेला जर सृष्टींतील नैसर्गिक फळमुळेच पुरेशीं झाली तर सर्व उद्योगधंद्रे व त्यांबरोबरच समाजांतील अधिभौतिक सुधारणा रसातळास गेली पाहिजे. किंवा आमच्या इकडील खऱ्या. निवृत्त साधूंप्रमाणे सर्व लोक सर्वसंगपरित्याग करून रानांत राहून फळांमुळांवर उपजीविका करूं लागले तर सर्व शहरें व त्यांतील सर्व धंदे नाहींसे झाले पाहिजेत हें उघड आहे.
 मानवी वामना किंवा अर्थशास्त्रांतील शब्द 'मागणीˈ व ‘ख यावर संपत्तीची उत्पति अवलंबून आहे, हें विधान कांहीं अंशां विरोधाभासात्मक आहे. संपत्तीची उत्पति त्याच्या खपावर म्हणजे त्याच्या उपभोगावर अगर नाशावर अवलवून आहे असा अर्थ होतो. परंतु याच्या सत्यतेबद्दल सर्व मानवी सुधारणा साक्ष देईल. कारण सर्व मानवी सुधारणा ह्मणजे मनुष्याच्या वासनांची वाढ व त्या तृप्त करण्याच्या विपुल साधनांची वाढ होय. व जसजसें मानवी गरजा व वासना यांचें स्वरूप मनुष्याच्या ज्ञानवृद्धीनें त्याच्या परिस्थितिभेदामुळें बदलत जातें तसतशी समाजांत उत्पन्न होणारी संपत्ति हिचें स्वरूपही बदलत जातें. उदाहरणार्थ, एका काळीं मनुष्याचें स्वसंरक्षणाचें साधन व लढाईचें व सैन्यातील शिपायाचें हत्यार म्हणजे तिरकमठा होता व तिरकमठा, तीर व भाता करण्याचा धंद्रा म्हणजे एक संपतेि उत्पादन करणारा धंदा होता. परंतु तो आतां कोठें गेला ? हजारों प्रकारचीं शस्त्रात्रे कोठे गेलीं? पूर्वींच्या काळच्या चिलखताचें काय झालें ? एखाद्या पदार्थसंग्रहालयांीिल शस्त्रागाराकडे दृष्टि फॅकली म्हणजे या बाबतींत केवढी क्रांति झाली आहे हैं दिसून येईल. म्हणजे मनुष्यांनीं केलेल्या नव्यानच्या शोथांनी मनुष्याच्या व राष्ट्राच्या संरक्षणाची गरज जरी कायम असली तरी त्याचे स्वरूपांत विलक्षण बदल झाला व यामुळें जसजशी मागणी बदलली तसतसे जुने