या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भाग चवथा.
श्रम

 अर्थशास्त्राच्या परिभाषेमध्यें हाती घेतलेल्या व्यवसायातील आनंदा खेरीज दुस-या कोणत्या तरी हेतूनें ह्मणजे मोबदल्याच्या हेतूनें केलेला मानसिक किंवा शारीरिक व्यवसाय ह्मणजे श्रम होय. या व्याख्येनें विरंगुळ्याकरितां, विश्रांतीकरितां किंवा करमणुकीकरितां जो मानसिक अगर शारीरिक व्यवसाय केला जाती तो श्रमारवाली येत नाहीं, तसेंच ज्या व्यवसायाचा हेतु दुस-या कोणत्याही कामाला उपयोगी पडण्याचा नाहीं तोही व्यवसाय श्रमारवालों येणार नाहीं. उदाहरणार्थ, क्रिकेट, टेनिस, आठयापाटया, तालिम इत्यादि शारीरिक खेळ किंवा पत्ते, गंजिफा, सोंगट्या व बुद्धिबळे इत्यादि बैठे खेळ हे श्रम या संज्ञेखालीं येणार नाहींत. तसेंच मनुष्य फक्त स्वतःच्या करमणुकीकरितां व विरंगुळा ह्मणून सुतारीवर, बागेवर. चित्रकलेवर किंवा ललितकलेवर जो परिश्रम करती तोही श्रम या संज्ञेखालीं येणार नाहीं या श्रमांमध्यें अगदी साध्या हातकामापामून तों बुद्धिसर्वस्व लागणाच्या सर्व व्यवसायाचा अंतर्भाव होतो. जो जो माणूस मजुरी घेऊन श्रम करतो तो तो मजुरदार व त्याचा व्यवसाय ह्मणजे अर्थशास्त्रदृष्ट्या श्रम होय. आपल्या मेहेनतीबद्दल कांहींएक ठरींव मोबदला घेणारा तो मजूर, मग त्याची मेहनत मानसिक असो, किंवा शारीरिक असो. खरोखरी शारीरिक किंवा मानासक व्यवसाय हैं वर्गीकरणच बरोबर नाहीं, कारण साध्या हातकामांत सुद्धां थोडा तरी मानसिक श्रम असतो व अत्यंत बिकट अशा मानसिक श्रमांतही थोडी तरी शारीरिक मेहनत असते.
 अभिमतपंथी अर्थशास्त्रकारांनीं श्रमाचे उत्पादक व अनुत्पादक असे दोन विभाग केलेले आहेत. या वर्गीकरणाच्या संकुचितपणामुळे अभिमत पंथ हा कांहीं आधुनिक ग्रंथकारांच्या कडक टीकेस पात्र झाला आहे. या वर्गीकरणाच्या इतिहासावरून संपति व तिचीं कारणें याबद्दलच्या कल्पनांत