या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६५]


कसकशी उत्क्रांति होत आली आहे हें दिसून येईल. हा भेद प्रथमतः निसर्गपंथी अर्थशास्त्रकारांनीं ठरविला व तो त्यांनीं आपल्या एककंल्ली संपत्तीच्या कल्पनेवरून ठरविला. त्यांचे मतें शेतकी किंवा जमीन हैं काय तें एकटें संपत्नीची वाढ करणारें कारण. तेव्हां जमीनदार व शेतकरी हे दोन वर्गच कायते उत्पादक वर्ग. कारखानदार, व्यापारी, नोकरचाकर हे सर्व अनुत्पादक. ह्मणजे जमीनदार व शेतकरी यांच्या शिल्लक संपत्तीवर या सर्व वगचिी उपजीविका अवलंबून आहे. हे वर्ग नवीन संपत्ति उत्पन्न करीत नाहींत. येथें संपत्ति म्हणजे धान्य इतकाच संकुचित अर्थ गृहीत धरल्यासारखा दिसतो व या दृष्टीनें जमीनदार व शेतकरी, हे सगाजांतील इतर सर्व वर्गाना अन्न पुरवितात हें खरें आहे, परंतु यावरुन हे दुसरे वर्ग दुस-या प्रकारची संपत्ति उत्पन्न करीत नाहींत असें मात्र नाहीं. या अत्यंत संकुचित कल्पनेवर बसविलेला भेद टाकून देऊन अॅडम स्मिथनें त्याला थोडें विस्तृत स्वरूप दिले. अॅडाम स्मिथनें ज्या श्रमाचा परिणाम अगर फल एखाद्या टिकाऊ माळामध्यें होतो तो उत्पादक श्रम, अशी उत्पादक अमाची व्याख्या केली आहे. या व्याख्येनें जमीनदार, शेतकरी, कारखानदार, मूजूर, वगैरे सर्व वर्गाच्या लोकांचे श्रम उत्पादक ठरतात. परंतु शिक्षक, शिपाई, नावाडी, वकील, डॅक्टिर व शेवटीं घरगुती नोकर या सर्वांचे श्रम अनुत्पादक ठरतात. मिल्लने उत्पादक हें पद आणखी जास्त व्यापक केलें. त्याचे मतें शिक्षक, शिपाई व वकील यांचे श्रम अनुत्पादक म्हणता येणार नाहींत. कारण शिक्षणानें अमाची कर्तबगारी वाढते व कर्तबगार मजूर लोक जास्त संपत्ति उत्पन्न करतात. तसेंच शिपाई, वकील, न्यायाधीश हे मालमत्तेला सुरक्षितता आणून अप्रत्यक्ष रीतीनें धनाच्या उत्पत्तीस मदत करतात. म्हणून मिल्लनें उत्पादक श्रमाची व्याख्या केली आहे ती ही कीं,प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें संपत्ती उत्पन्न करण्यास मदत करणारं व्यवसाय म्हणजे उत्पादक श्रम होय. परंतु ही व्याख्या इतकी विस्तृत आहे कॉं.या व्य्स्येप्रमाणें सर्व व्यवसाय जे अर्थशास्त्राच्या श्रम या शब्दांत अंतर्भूत होतात ते सर्व उत्पादकच ठरतात. उत्पादक व अनुत्पादक हा भेद व्यर्थ होता. कारण ज्या ज्या व्यवसायाबद्दल समाजांत मनुष्याला मोबदला मिळतो तो तो व्यवसाय उत्पादक श्रमांत येतो व अनुत्पादक श्रम हा शब्दप्रयोगच मुळीं असंबद्ध होती.