हे पान प्रमाणित केलेले आहे.
[६७]


घाटावरील घाटवळ लोक हे शरीरसामर्थ्याने सर्वांत वर आहेत. यामुळे सर्व मोठ्या मेहनतीचीं कामें याच लोकांचे हातांत आहेत. मुंबईतील हमालांचीं कामें, गोंदीतील कामें, स्टेशनावरलि मोठमोठे बोजे उचलण्याचीं कामें बहुधा या लोकांच्या हातीं आहेत. तोच कोंकणांतील मजूर जरी घाटीलोकांइतका शक्तिमान व मजबूत नसतो तरी पण चलाखपणांत कंटकपणांत व हुशारींत त्याचा वर नंबर लागतो. यामुळे मुंबईत घरगुती कामांत, आफीसाच्या कामांत व गिरणींतील कामांत याच लोकांचा जास्त भरणा आहे. तरी पण सुधारलेल्या देशांच्या मानानें हिंदुस्थानांतील सर्व ठिकाणचा व सर्व वंशांचा मजूरवर्ग कमी प्रतीचा आहे हें कबूल करणें भाग आहे.
 दुसरी गोष्ट मजुरांना मिळणारें खाणेंपिणें व अन्न यांवर त्यांची कार्यक्षमता अवलंबून असते. ज्या ज्या ठिकाणीं मजुरांना खाणेंपिणें भरपूर मिळून त्यांचें अन्न पौष्टिक असतें तेथें तेथें मजुरांची कार्यक्षमता जास्त असते. या बाबतींतही अमेरिकेंतील मजुरांचा नंबर सर्वांत वर लागतो. युरोपमध्यें आयर्लंडच्या मजुरांचें अन्न निःसत्व बटाट्यांचें असतें. यामुळे त्यांची कार्यक्षमता फार कमी असते. मनुष्यप्राणी याची स्थिति कांहीं अंशों एंजिनासारस्वी असते. ज्या मानानें एजिनांत कोळसा व पाणी घालावें त्या मानानें एंजिनापासून कमजास्त उष्णता व शक्ति उत्पन्न होऊं शकते, त्याचप्रमाणें मनुष्याला जास्त व पौष्टिक खायला घातलें तर त्याचे हातून काम जास्त होतें. परंतू हा क्रम कांही काळपर्यंत चालतो. एजिनच्या आटोकाट शक्तीबाहेर जर कोळसा घातला तर एंजिन एकदम फुटून जाइल, तसेच मनुष्याच्या अटोकाट पाचकशक्तीपेक्षां जर अन्न जास्त घातलें तर मनुष्याच्या जीवालाच अपाय होईल. परंतु या मर्यादेच्या आधीं जितकें जास्त अन्न तितकें जास्त काम हा नियम खरा आहे.
 हिंदुस्थानाध्यें एकंदर दारिद्य फार असल्यामुळे पुष्कळ लोकांना पोटभर व पुरेसें अन्न मिळतें किंवा नाहीं, याबद्दल शंका आहे. तेव्हां तें अन्न कमी पौष्टिक आहे किंवा जास्त पौष्टिक आहे यांची तुलना फारशी शक्य नाहीं. यामुळे येथल्या एकंदर मजूरवर्गीची कार्यक्षमता कमी . आहे; तरी अन्नाच्या पौष्टिकपणावर सामर्थ्य अवलंबून आहे हें येथेंही