हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७२]


डागिने वगैरे. हे एक प्रकारचे भांडवल आहे. कारण यापासूनही वार्षिक उपभोग मिळतो. एखाद्या माणसानें ४००० रुपये ब्याकेंत ठेविले व त्याच्या व्याजांत तो भाड्याच्या घरांत राहीला काय,किंवा ४००० रुपयांचे स्वतःचे घर बांधलें काय, वास्तविक अर्थ एकच आहे. पहिल्या प्रकारांत त्याचे ४००० भांडवल असून त्याला व्याजाच्या रूपानें उत्पन्न मिळते. परंतु दुसऱ्या प्रकारांत ते भांडवल रुपयांच्या रूपांत न राहतां घराच्या रूपांत आहे. परंतु त्याला घराचा उपभोग या रूपानें वार्षिक उत्पन्न येतच आहे. तेव्हां असे टिकाऊ संपत्तीचे प्रकार म्हणजे एक भांडवलच आहे.
 वरील विवेचनावरून भांडवलाचे तीन प्रकार सिद्ध होतात. पहिलें उपभोगाचे भांडवल; दुसरें उत्पन्नाचे भांडवल; तिसरें धनोत्पादक भांड वल. धनोत्पादक भांडवल हे वार्षिक उत्पन्न देते म्हणून सर्व धनोत्पादक भांडवल उत्पन्नाच्या भांडवलांत अन्तर्भूत होते. परंतु सर्व उत्पन्नाचे भांड वल मात्र धानोत्पादक भांडवल असते असे नाही. उदाहरणार्थ, अनें बला कर्जाऊ रुपये दिले व त्याच्याबद्दल त्याची लागवडीची जमीन गहाण लावून घेतली; तर आतां अला वार्षिक उत्पन्न येऊ लागलें खरें. परंतु बचे उत्पन आतां कमी झाले. कारण त्याच्या इस्टेटींतून या कर्जाचे व्याज जाऊ लागले. येथे धनोत्पादक भांडवल होतें तितकेच राहिले. मात्र पूर्वी त्या भांडवलाचा ब हा एकटाच मालक होता; तेथे आतां अ आणि व यांमध्ये मालकी विभागून गेली इतकाच फरक झाला.
 वरील विवेचनावरून भांडवलाचे तीन प्रकार होतात. पाहिल्यामध्ये वार्षिक उत्पन्न देण्याच्या गुणाला प्राधान्य असतें. दुस-यांत नवीन धनो त्पादकता याला प्राधान्य असते;तर तिसऱ्यात उपभोगसातत्याला प्राधान्य असते. आतां या तिन्ही प्रकारच्या भांडवलांच्या कल्पनेमध्ये कोणची मूळ कल्पना सामान्य आहे याचा विचार करतांना सर्वास समान अशी एक मूळ कल्पना सांपडते व या मूळ कल्पनेप्रमाणे सर्व प्रकारच्या भांडव लाची खालील व्याख्या ठरते. ‘‘ अप्रत्यक्ष रीतीने किंवा प्रत्यक्ष रीतीनें भावी गरजा भागविण्याकरितां निराळी काढून ठेविलेली संपत्ति म्ह्णजे भांडवल होय." मग या गरजा मनुष्य आपली संपत्ति दुसऱ्यास कर्जाऊ किंवा भाड्याने देऊन येणाऱ्या उत्पनाने भागवो, अगर भावी धनोत्पादनां- तृन भागवो; अगर सतत आनंद देणाऱ्या स्थिर संपत्तीच्या मालकीने भागवो.