हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७५]

 करण्याचा सुलभ मार्ग म्हणजे आयात मालावर जबर जकात बसविणें हा होय. अर्थात् निवळ कायद्याच्या व नियमांच्या घटनेनें उद्योगधंदे वाढवितां येतात असा सामान्य समज झालेला होता. या समजांतील हेत्वाभास दाखवण्याकरितां मिल्लनें आपलें पहिलें प्रमेय सांगितलें आहे हें उघड दिसतें. ते हें कीं, उद्योगधंद्याची वाढ देशांत आस्तित्वांत असलेल्या भांडवलावर अवलंबून आहे व जोंपर्यंत निवळ कायद्यानें नवीन भांडवल उत्पन्न करण्याची शक्ति येत नाहीं तोंपर्यंत नुसत्या जकातीच्या कायद्याच्या हातचलावानें एका धंद्याच्या ऐवजीं दुसरा धंदा देशांत वाढवितां येईल खरा; परंतु एकंदर धंद्यांमध्यें वाढ करतां येणार नाहीं. म्हणजे मिल्लच्या लिहिण्याचा रोंख असा होता कीं, कायद्यानें उद्योगधंद्यांस कधींच उत्तेजन देतां येणार नाहीं; परंतु अर्वाचीन अर्थशास्त्रयांना हें विधान सर्वांशीं कबूल नहीं. कारण कांहीं कांहीं बाबतींत कायद्यानें सुद्धां धंद्यांची वाढ करतां येईल असें त्यांचें म्हणणें आहे. प्रजेच्या चैनीच्या खर्चावर कर बसवून त्यांतून उत्पादक धंदेही सरकारास काढतां येतील. सारांश, या एका प्रमेयावरून अप्रतिबंधव्यापार व संरक्षण ह्या वादग्रस्त प्रश्नांचा निकाल लागणार नाहीं इतकें मात्र खास. बाकी सामान्यतः मिल्लचें प्रमेय खरें आहे. कारण अवाचीन काळीं भांडवलाखेरीज कोणत्याच बाबतींत सुधारणा करतां येणार नाहीं. भांडवलावांचून शेतकी सुधारतां येणार नाहीं'; भांडवलावांचून नवे धंदे निघणार नाहीत; भांडवलावांचून खाणीही चालूं शकणार नाहींत व भांडवलावांचून कारखाने उभारले जाणार नाहींत. या दृष्टीनें मिल्लचें प्रमेय सत्य आहे.

 मिल्लचें दुसरें प्रमेय भांडवलाच्या उत्पत्तीबद्दल अगर वाढीबद्दल आहे. ' भांडवल हें काटकसरीनें सांचलेल्या शिलकेचें फळ आहे. ' या प्रमेयाचा अर्थ उघड आहे. ज्याप्रमाणें एका व्यक्तीच्या संपत्तीची वाढ, आदा व खर्च यांतील सालोसालच्या वजाबाकीवर अवलंबून आहे. त्याप्रमाणेंच राष्ट्रीय भांडवलही काटकसरीचें फळ आहे, हा या प्रमेयाचा सरळ अर्थ आहे. ज्याप्रमाणें पहिलें प्रमेय हें संरक्षणवाद्यांच्या मताचें खंडण करण्याच्या हेतूनें मिल्लनें प्रतिपादन केलें; त्याचप्रमाणें हें प्रमेय व पुढें सांगावयाचें चवथें प्रमेय हींही एका सामान्य मताच्या खंडणार्थ मिल्लनें प्रतिपादिलीं आहेत. हें सामान्य मत म्हणजे उधळेपणा हा उद्योगधंद्यास व