हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७६]

 कामगारांच्या मजुरीस उत्तेजक आहे व चिक्कूपणा हा उद्योगधंद्यांच्या आंड येणारा आहे. या समजांतील हेत्वाभास दाखविण्याकरितां मिल्लने भांडवलाची वाढ कशी होते हें या प्रमेयांत सांगितलें आहे. परंतु या प्रमेयांतील काटकसर हा शब्द् भ्रामक व संदिग्ध असल्यामुळेंच मिल्लच्या या प्रमेयाबद्दल फारच शुष्कवाद वाढला आहे. जर प्रत्येक मनुष्य आपल्या उत्पन्नांत काटकसर करुन खर्च कमी करूं लागला तर संपत्तीच वाढणार नाहीं. कारण संपत्तीच्या वाढीचें मूळ :बीज मानवी वासनांच्या वाढींत आहे. अर्थात् मनुष्याचा जितका खर्च जास्त तितकी मालास मागणी अधिक व त्याच मानानें संपत्तीच्या वाढीस उत्तेजन येईल. परंतु काटकसर याचा मिल्लनें संकचित अर्थ केला नाहीं व त्याच्या या प्रमेयांत असा संकुचित अर्थ घेतला नाहीं म्हणजे हें प्रमेय सत्यरूप आहे. काटकसर याचा अर्थ आद्याच्या बाहेर खर्च न करणें इतकाच आहे. भांडवल हें काटकसरीचें फळ आहे; ह्मणजे जे भांडवल जमवितात ते आपल्या गरजा मारतात व मोठया हालअपेष्टा सोसतात असा अर्थ नाहीं. तर देशांतील संपत्तीची उत्पत्ति व संपत्तीचा व्यय यांमधील अंतरावरच भांडवलाची वाढ अवलंबून आहे. अर्थात् संपत्तीची वाढही पुष्कळ झाली पाहिजे व खर्चही पुष्कळ झाला पाहिजे. परंतु भांडवलाची वाढ या दोहोंच्या अंतरनिंच होते हें कांहीं खोटें नाहीं. देशांमध्यें पेढ्यांसारख्या संस्था विपुल झाल्या म्हणजेसुद्धां भांडवल प्रत्यक्ष शिलकेशिवाय पेढ्यांच्या कृतीनें वाढतें हें खरें आहे. परंतु सामान्यतः मिल्लचें प्रमेय सत्य आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.

 मिल्लचें तिसरें प्रमय भांडवलाच्या कार्यभागासंबंधीं आहे / भांडवल हें जरी काटकसरीचें फळ आहे तरी त्याचा सं५त्ती उत्पन्न करण्याचा कार्यभाग त्या भांडवलाच्या व्ययानेंच होती.' या प्रमेयामध्यें मिल्लनें ‘शिल्लक किंवा काटकसरीचें फल' यांमधील व निवळ चिक्कूपणाच्या सांठ्यांतील फरक दाखविला आहे. जी संपत्ति निवळ पेटींत, जमिनींत अगर भुयारांत सांठविली जाते ती खरोखरी भांडवल नव्हे. तें अनुद्भूत भांडवल आहे किंवा फार तर तें उपभोगाचें भांडवल असेल. परंतु तें धनोत्पादक भांडवल नव्हे. धनोत्पादक भांडवल बनण्यास त्याचा योग्य प्रकारें विनियोग अगर व्ययच झाला पाहिजे. धान्य जमिनींत पेरलें गेलें