या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८२]


 हिंंदुस्थानाकडे पाहिलें तर या शेवटच्यां वर्गाची हिंदुस्थानांत फारच उणीव आहे असें दिसून येईल. हिंंदुस्थान हा देश सुपीक आहे; सृष्टीच्या नैसर्गिक शक्ति येथें मुबलक आहेत. मजूरवर्ग तर हवा तेवढा आहे. भांडवल मात्र पुष्कळ कमी आहे. परंतु योजक अगर कारखानंदार त्यापेक्षांही दुर्मिळ आहेत. म्हणूनच हिंदुस्थान देश उद्योगधंद्यांत सुधारलल्या राष्ट्रांच्या इतका मागें आहे. हल्लींच्या काळींं संपत्तीच्या वाढीस योजकांचें केवढें साहाय्य होतें याचें हिंदुस्थानांतील ताजें उदाहरण म्हणजे केै० टाटासाहेबांचा मध्यप्रांतांतील प्रचंड लोखंडाचा कारखाना होय. हा कारखाना सुरू झाला म्हणजे हिंदुस्थानची लोखंडाची बरीचशी मागणी या एका कारखान्यानें भागविली जाईल. यावरून त्याचें अवाढव्यत्व लक्षांत येईल. परंतु एवढा मोठा कारखाना कै. टाष्ट्रा यांच्यासारखा योजक मिळाला म्हणूनच अस्तित्वांत आला; नाहीं तर जमीनींत लोखंड होतें; मजूर कामाखेरीज देशांत मरत होते व भांडवलही नव्हतें असें नाहीं. परंतु या सर्व सामग्रीला एकत्र आणणें, कारखान्याची जुळवाजुळव करणें, कारखाना यशस्वी होईल अशां भरंवशावर प्रथमतः लाखों रुपये खर्च करून प्रयोग करून माहिती मिळविणें व प्रथमपासून कारखान्याची जबाबदारी अंगावर घेणें इतक्या गोष्टी करणारा दुर्लभ योजक मिळाला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ति उत्पन्न करणारा एक कारखाना निघाला. केै० टाटाशेटजींंच्या कल्पकतेचें व योजकतेचें दुसरें उदाहरण म्हणजे खंडाळ्याच्या घाटांतील वीज उत्पन्न करणा-या कारखान्याची कल्पना. हिला अजून मूर्तस्वरूप आालें नाहीं हें खरें, तरी पण हा कारखाना झाला म्हणजे तोही योजकाच्या श्रमाचें व कल्पकतेचेंच मोठें स्मारक होईल. वरील विवेचनावरून अर्वाचीनकाळींं संपत्तीच्या उत्पादनाच्या कामांत कारखानदाराचा केवढा मोठा कार्यभाग आहे हें सहज दिसून येईल.
 यासंबंधींं आणखैीही एका कारखान्याचें उदाहरण घेण्यासारखें आहे. तें म्हणजे अलेंबिक केमीकलवर्कचें होय.हा कारखाना केै० टाटाशेटजींच्या वर निर्दिष्ट केलेल्या कारखान्याइतका प्रचंड नसल्यामुळें तो तितका चमत्कृतिजनक नाहीं. तरी पण या कारखान्यामध्यें सुद्धां योजकाचें महत्व दिसून येतें. पश्र्चिम हिंदुस्थानांत तरी असला कारखाना अगदीं