या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८७]

 व हे स्वतंत्र धंदे करणा-या लोकांचे तितके निरनिराळे वर्ग होतात. हें अमविभागाचें तत्त्व समाजाला व्यवस्थित स्वरूप देतें. इतकेंच नव्हे तर प्रत्येक मनुष्य आपआपल्या गुणानुरूप एक काम सदोदित करू लागला ह्मणजे त्याचें कौशल्य वाढतें. त्याला पुष्कळ लोकांच्या गरजा चांगल्या तहेनें भागवितां येतात व समाजांत कलाकौशल्य व हस्तकौशल्य यांची फार वाढ हेोते व त्यायोगें संपत्नीही पुष्कळच वाढते.
 ज्याच्या योगानें संपत्तीचीं वरच्यापेक्षांही जास्त विलक्षण वाढ होते तो श्रमविभाग ह्मणजे औद्योगिक श्रमविभाग होय. यामध्यें एका धंद्यांतील निरनिराळ्या कृतींचे पृथक्करण केलें जातें. याचें इतिहासप्रसिद्ध उदाहरण ह्मणजे अॅडाम स्मिथनें दिलेलें टांचण्यांच्या कारखान्याचे उदाहरण होय. एक लोहार जर दिवसाचे दहा बारा तास काम करून टांचण्या करूं लागला तर त्याला एका दिवसांत २०/२५ टांचण्या होणें मुष्किलीचें होईल. परंतु येथें श्रमविभागाचें तत्व अमलांत आणलें म्हणजे १० कामगार एका दिवसांत हजारों टांचण्या करूं शकतील. कारण टांचणी करण्याच्या सर्व व्यापारांपैकी एकच कृति एक मनुष्यू करतो व यामुळं काम जलद व सुबक होतें. एक मनुष्य तार कापतो; एक तीओढतो; एक नेढें तयार करतो; एक नेढें बसवितो; व एक त्याला पाणी देतो व शेवटी एक टांचण्या कागदांत हारीनें लावतो. याप्रमाणे तारं तुष्टण्यापासून तों टांचण्यांचीं बिंडोळीं बनेपर्यंत सारखा क्रम चालतो, हिदुस्थानांत टांचण्यांचा कारखाना पाहाण्यांत येण्याचा संभव नाही. म्हणुनु आपल्या इकडील नेहमींच्या व्यवहारांतील एका पदार्थांचे उदाहरणही येथे उपयोगीं पडेल. आपण जेवण्याला पितळी वाट्या घेतों. या हल्ली कारखान्यांत यंत्राच्या साहाय्यानें करतात, व त्या किती जलद होतात हें कारखाना प्रत्यक्ष पाहिल्यावांचून ध्यानांत येणार नाहीं. येथें सर्व काम यंत्रानेंच होतें. प्रथमतः एक मनुष्य पितळेच्या पत्र्याचे, वाट्या जेवढ्या पाहिजे असतील तितक्या रुंदीचे तुकडे यंत्रानें पाडतो; हे तुकडे घेऊन दुस-या यंत्रानें दुसरा मजूर त्याचे चौकोनी तुकडे करतो.तिसरा मजूर तुकडे सारखे जुळून चवथ्या मजुराजवळ देतो.तो तिसऱ्या यंत्राने चौकोनी तुकड्यांचे वर्तुळ तुकडे बनवितो. पुढे हे वर्तुळ तुकडे चवथ्या यंत्रामध्यें घालूंनें दाबानें त्याला वाटीचा आकार एक मजूर आणतो. येथें