या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

॥ श्रीहरिः ॥
निवेदन

भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।। १ ॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रभु अर्जुनेंसी ।। २ ।|
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां सांचें । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥ ३ ॥
 एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरीं मनीं ज्ञानेश्वरी ॥। ४ ॥

 श्रीभगवंतांनी आपल्या अवताराची प्रयोजने साधूंचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन व धर्मसंस्थापन ही तीनच जरी सांगितली असली, तरी अन्य अनेक कारणांसाठी भगवंत अवतार घेतात आणि त्यावेळी त्यांच्या या विश्वाच्या कल्याणाची अनेक कार्ये करतात. हेच पहा ना ! अर्जुनाला निमित्त करून जगाला गीता सांगण्यासाठी ते जगद्गुरू बनले. ही गीता संस्कृत भाषेत व काहीशी सूत्रमय आहे. कालांतराने तिचा बोध सामान्य जनांना होणे कठीण आहे, असे पाहून अनेकांना 'बुद्धियोग' देऊन त्यावर भाष्ये करण्याची प्रेरणा त्यांनीच दिली. इतकेच नव्हे, तर स्वत:च 'ज्ञानदेव' रूपाने अवतरून तीच गीता भावार्थदीपिकेच्या रूपात, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी, मराठीत सुंदर सुंदर उदाहरणे देऊन प्रतिपादन केली. या ज्ञानेश्वरीची, श्रीएकनाथमहाराजांसारख्या पंडित संताने केलेली भलावण वरील अभंगात आलेली आहे.
 हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या प्रस्थानत्रयीतील प्रमुख ग्रंथ आहे. वारकरी बनलेला कोणताही भाविक नित्य ज्ञानेश्वरीचे पठन किंवा श्रवण केल्यावाचून राहात नाही. या ज्ञानेश्वरीतील एकेका ओवीवर अनेक प्रवचने करणारे विद्वान महाराष्ट्रात आहेत. या ग्रंथात गीतेतील अद्वैत तत्त्वज्ञान, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोग, विशेषतः भक्तियोग यांचे अनुपम