हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १२३


कुंडात माझी पूर्णाहुती पडत होती. मी व्यथित होऊन कळवळून म्हणाले, "होय, होय. माझी धाकटी नात मीच, शेपटी हालवीत, भावपूर्ण डोळ्यांनी माझ्याकडे पाहणारा कुत्रा मीच, निळ्या आकाशातून भरदिशी जाणारा कोकीळ मीच, भव्य संध्याकाळ मीच, आइश्मान, स्टालिन, हिटलर, खून करणारे, घरे जाळणारे, दंगा माजविणारे, जळत्या घरातून होरपळणारे, खड्ड्यात जाणारे जीवही मीच आहे. खरंच, सगळं मीच आहे."

 माझी कबुली पूर्ण झाली. ज्या क्षणी ज्ञान झाले, त्याच क्षणी मी भस्म होऊन गेले.

१९६३