हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ७५

असे त्याचे स्पष्ट मत होते. नीतीतत्वाची ही मीमांसा पाश्चात्य जगास फारच पसंत पडली. दोनशे वर्षे ती आपला अंमल जगभर गाजवून आहे. भारतातील सिंहाचे एका राजाने जे ऐकले नाही, ते ह्या ब्रिटिश नरसिंहाचे म्हणणे जगाने शिरोधार्य मानले. शिवाय, गाय खायला मिळाली नाही, वचपाही गायखाऊ राष्ट्रात जन्मल्यामुळे निघाला. जन्मल्यापासून मरेपर्यंत बेंथम नरसिंहाने कितीतरी गुरे खाल्ली असणार. बेंथम १८३२ मध्ये मेला. कृतार्थ, सुफलीत जीवन जगून गेला. परत जन्म घेण्याची त्याला आवश्यकता राहिली नाही.

१९७०

 हा लेख कालिदासीय रघुवंशाच्या दुसर्‍या सर्गावर आधारलेला आहे. भाषांतर गोळाबेरीज आहे; शब्दश: नाही.