या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अपूर्णांक

आपण अभ्यासाला सुरुवात अपूर्णांकांपासून करू या.या अपूर्णांकांची तुम्हाला माहिती आहे. उदाहरणार्थ भाकरी म्हणजे अर्धी भाकरी - म्हणजेच एका भाकरीचे दोन सारखे भाग करून त्यातला एक घेतला की ती झाली भाकरी.

भाकरी म्हणजे एका भाकरीचे चार सारखे भाग करून त्यातले तीन घ्यायचे. भाकरी म्हणजे 7 सारखे भाग करून त्यातले सहा घ्यायचे. भाकरी म्हणजे ५ सारखे भाग करून त्यातले 2 घ्यायचे.

आता भाकरी म्हणजे काय बरं ? सारखे चार भाग केले व त्याच आकाराचे 5 भाग घेतले म्हणजे झाले . म्हणजे हा एकाहून मोठा होणार हं ! तसंच म्हणजे अर्थी भाकरी तीन वेळा घ्यायची. आता या सगळ्यावरून एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा - अपूर्णाकाचा खालच्या बाजूचा अंक म्हणजेच छेद हा सारखे भाग करण्यासाठी, म्हणजे भागाकार करण्यासाठी वापरायचा. सारखे भाग केले की त्यात एका भागाएवढे एकूण किती भाग घ्यायचे, तर वरच्या अंकाएवढे। म्हणजे वरचा अंक किंवा अंश हा गुणायला वापरायचा.

अपूर्णांक