या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सरावासाठी खालील वेरजा व वजाबाक्या करा.

(1) (8 + 4ब - क) + (2अ - 6ब + 3क)

(2) (2म + 3न + 4क्ष) + (म - 7न + क्ष)

(3) (7क + 5ख - 2ग) + (- 3क + ख - 2ग)

(4) (5 अ + 10ब - 25क) - (2अ - 4ब + 10क)

(5) (8 क + ख + 4ग) - (- क + 2ख + 3ग)

(6) (4म – न + 13) - (2म - न - 1)

समीकरण

समीकरण म्हणजे दोन पदांची सारखीच किंमत आहे हे दाखवणं. समीकरण हे दोन्ही बाजूंना सारखेच वजन ठेवलेल्या व्यवस्थित तोलून, आडव्या स्थितीत राहिलेल्या सी सॉ सारखे असते.

अशी कल्पना करा की सी सॉ च्या दोन्ही बाजूंना दोन सारख्या वजनाचे भांडखोर जुळे भाऊ आहेत. एका बाजूच्या भावाला काही दिलं तर दुसया बाजूच्या भावालाही तेवढंच द्यावं लागतं नाही तर त्यांचे भांडण होऊन सी सॉ वाकडा होईल. म्हणजे, समीकरणाच्या डाव्या बाजूवर जी क्रिया करायची, तीच उजव्या बाजूवरही करावी लागते तरच समीकरण बरोबर राहतं.

समीकरण
१५