या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना


विद्यार्थी मित्रांसाठी,

हे पुस्तक तुमच्या पाठ्यपुस्तकाची जागा भरून काढू शकणार नाही. पण पाठ्यपुस्तकात वाचून अथवा शाळेत शिकूनही गणिताचे काही भाग नीट समजले नसतील, विशिष्ट प्रकारची गणितं सोडवता येत नसतील, तर या पुस्तकाची मदत होऊ शकेल. केवळ परीक्षेत मार्क मिळवण्यापुरतं गणित शिकवण्याचा याचा उद्देश नाही, तर गणित विषयाचे नीट आकलन व्हावं, भीति नाहीशी हावी व स्वतः गणितं सोडवण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता यावा, पुढे कुठल्याही क्षेत्रात आवश्यक तेवढं गणित शिकण्याची तुमची तयारी असावी हा या पुस्तकाचा उद्देश आहे. पाचवी सहावी व सातवीच्या गणिताचे नीट आकलन होण्यास या पुस्तकाची मदत होईल. भूमिती व आणखी काही भाग यात घेतलेले नाहीत. मुख्य करून ज्या विभागातील गणिते सोडवताना विद्यार्थी गोंधळतात, चुका करतात ते विभाग या पुस्तकात घेतले आहेत. गणिताच्या अभ्यासाला लागताना लक्षात ठेवा-

(1) 2 ते 10 चे पाढे तोंडपाठ असले पाहिजेत. 15 किंवा 20 पर्यतचे पाढे येत असतील तर अधिक चांगले.

(2) बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या क्रियांचा चांगला सराव हवा. नाहीतर थोडक्यासाठी, रीत बरोवर असूनही गणित चुकण्याची शक्यता आहे.

(3) एखादा विभाग नीट समजला नसेल, तर या पुस्तकातील तसेच पाठ्यपुस्तकातील त्याचे स्पष्टीकरण शांतपणे वाचून पहा. नमुन्याची गणिते लक्षपूर्वक पहा. दोनदा वाचूनही समजले नाही तर शिक्षक, वरच्या वर्गातील किंवा तुमच्याच वर्गातील हुषार व उत्साही विद्यार्थी यांची मदत घ्या. प्रयत्नाने समजणार नाही असा अवघड भाग