या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संख्येने भाज्यालाही गुणलं तर भागाकार बदलणार नाही म्हणून भाजकाचा पूर्णांक बनवण्यासाठी ज्या संख्येने भाजका गुणायचं त्याच संख्येने भाज्यालाही गुणावं लागतं, किंवा भाजकाचा पूर्णांक करण्यासाठी दशांश टिंब जेवढी स्थाने उजवीकडे सरकवावं लागतं तेवढीच स्थाने भाज्यातील दशांश टिंबही उजवीकडे न्यावं लागतं.

38.16 ÷ 1.2 मधे, 1.2 हा भाजक आहे व त्यातील दशांश टिंब एक स्थान उजवीकडे नेलं की तो 12 हा पूर्णांक होतो मग भाज्यातही तेच करून 381.6 असा नवा भाज्य मिळतो. म्हणून 38.16 ÷ 1.2 म्हणजेच 381.6 ÷ 12 हे मिळालं की 381.6 ÷ 12 हा भागाकार नेहमीप्रमाणे करायचा. पण दशांश टिंब द्यायचे. जसे

 इथे भाज्यातील 38, 1 हे आकडे वापरून झाल्यावर टिंबानंतरचा 6 हा आकडा खाली उतरवताना भागाकारात 31 नंतर टिंब दिले आहे. एरवी भागाकाराची पद्धत तीच.




आणखी एक उदाहरण पहा -

23.8 ÷.14 इथे भाजक .14 आहे तो 14 करताना दशांश टिंब दोन स्थाने उजवीकडे हलवले. भाज्यात टिंबानंतर एकच आकडा आहे पण नंतर हवी तेवढी शून्ये घेता येतात म्हणून दोन स्थाने दशांश टिंब उजवीकडे नेऊन भाज्य बनतो 2380.

म्हणून 23.8 ÷ .14 = 2380 ÷ 14

याप्रमाणे भागाकारही पूर्णांक म्हणजे 170 आला.





दशांश अपूर्णांक
५३