या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिलेल्या दोन संख्यांचा मसावि शोधण्याची ही रीत सोपी आहे ना? मात्र भागाकार करण्याची भरपूर सवय हवी त्यात चुकू नका.

 दिलेल्या संख्यांचा लसावि शोधण्याची अशी सोपी रीत सरळ सरळ दिसत नाही. पण एक सूत्र तुम्हाला उपयोगी पडेल. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावि व मसावि यांच्या गुणाकाराएवढा असतो. म्हणजे M व N या दोन संख्या असतील व A हा त्यांचा मसावि व B हा लसावि असेल तर.

M X N = A X B

आता A = (M, N) शोधण्याची सोपी रीत वापरून A ची किंमत काढली तर वरील समीकरणाच्या दोन्ही बाजूंना A ने भागून व बाजूंची अदलाबदल करून

B = M x N/ A असे सूत्र मिळते.

सरावासाठी खालील जोड्यांचे मसावि व लसावि काढा.

(1) 48, 68

(2) 172, 120

(3) 120, 195

अपूर्णाक व बीजगणित :

अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी वे गुणाकार भागाकार आपण शिकलो आहोत. एक गोष्ट विसरू नका की एखाद्या व्यवहारी अपूर्णांकाने भागाकार म्हणजेच तो अपूर्णाक उलटा करून त्याने गुणाकार करायचा. जसे

4/9 ÷ 1/3 = 4/9 x 3/1 = 4/3 किंवा 5/12÷ 2/3 = 5/12 x 3/2 = 5/8

या गणितात आणखी एका गोष्टीचा सराव हवा. अपूर्णाकांचे गुणाकार

अपूर्णांक व बीजगणित
६५