या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लहान, कमी क्षेत्रफळाचा तुकडा कुठला बरं? एक सेंटिमीटर वाजू असलेला लहानसा चौरस हा परिमाण म्हणून वापरतात. आकृति मोठी असेल, एखाद्या शेताप्रमाणे, तर एक मीटर बाजू असलेला चौरस सोयीचा पडतो. चौरस म्हणजे सगळ्या बाजू सारख्या लांबीच्या व सगळे कोन ९०° किंवा काटकोन असलेला चौकोन.

एक चौ. सें.मी. = एक चौरस सेंटिमीटर चे परिमाण

 कुठलीही सपाट आकृति असेल तर तिचे क्षेत्रफळ चौरस सें.मी. च्या परिमाणाने मोजता येते. आतां ABCD हा काटकोन चौकोन व PQRS हा चौरस पहा. AB = 6c.m., BC = 2 c.m. व PQ = 4 c.m. आहे



म्हणून आकृतीत दाखवल्याप्रमाणे ABCD मधे 12 चौ. सें.मी. व PORS मधे 16 चौ. सें.मी. व्यवस्थित बसतात. म्हणून ABCD चे क्षेत्रफळ 12 चौ. सें.मी. व PQRS चे क्षेत्रफळ 16 चौ. सें.मी. आहे. काटकोन चौकोन किंवा चौरस आकृतींचे क्षेत्रफळ मोजणे सोपे असते. काटकोन चौकोनाची लांबी x रुंदी = क्षेत्रफळ हा नियम लक्षात ठेवा. मात्र लांबी व रूंदी मोजायला सें.मी. हे परिमाण असेल, तर क्षेत्रफळ चौ. सें.मी. मधे मिळेल. लांबी व रूंदी मीटर मधे मोजली असेल, तर क्षेत्रफळ वरील गुणाकाराने 'चौरस मीटर'


८८
गणिताच्या सोप्या वाटा