या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७ + ८ किती
११
फक्त दोन आकड्यांचं गणित आणि हे आकडे म्हणजे :
०, १.
इथे लागू पडणारे बेरजेचे नियम म्हणजे :
० + ० = ० ० + १ = १
१ + १ = ०
हे नियम बनवताना तर्कशास्त्राची कास धरावी लागते. कशी ते आपण पाहू. समजा, आपण सुरवात केली पहिल्या नियमापासून.
० + ० = ०
त्यानंतर ० + १ म्हणजे किती?
पर्याय दोनच आहेत :
० + १ = ०, ० + १ = १
पैकी पहिला पर्याय घेतल्यास पहिल्या नियमाशी तुलना केल्यास ० आणि १ मध्ये काहीच फरक नाही असं दिसून येतं. म्हणून दुसरा पर्याय घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे १ + १ करता जे दोन पर्याय आहेत; त्यातला १ + १ = ० हाच बरोबर हे थोडा विचार केल्यास (आणि पहिल्या दोन नियमांशी तुलना केल्यास) दिसून येईल.
हे लहानसं गणित व्यवहारात कुठे लागू पडतं?
लेखांक २ मधील कोड्याचे उत्तर
खांबाला बांधलेल्या दोराचे टोक 'अ' हाताभोवतालच्या रिंग मधून
"ब" या ठिकाणातून बाहेर काढून त्या हाताच्या बोटावरून न्यावे.