या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोळाफुलीचा खेळ
२७


असे नऊ भाग केले आहेत आणि प्रत्येक सेलमध्ये गोळा किंवा फुली काढता येते.

एक नवीन खेळ :

 आता ह्यापेक्षा अधिक बुद्धिरंजक खेळ पाहूया. दोन डायमेन्शन्समध्ये (म्हणजे एका समतलावर) चौकोन काढण्याऐवजी तीन डायमेन्शन्समध्ये एक घनाकृती ठोकळा काढूया. (पहा चित्र क्र. २) त्याचे तीन बाय तीन असे २७ भाग केले की प्रत्येक भाग म्हणजे एक लहान घनाकृती ठोकळा होतो. त्याला सेल म्हणू या.

चित्र क्र. २

 आता दोघा प्रतिस्पध्र्यांनी फुली आणि गोळा क्रमाने प्रत्येक सेलमध्ये काढावेत, अशा त-हेने की प्रत्येकाचा प्रयल स्वतःची तीन चिन्हे (X किंवा ०) एका रेषेत बसतील अशा जास्तीत जास्त सरळ रेषा असाव्यात हा.